नवीन लेखन...

पाऊलवाट

वाट चढणीची ही गडकोटी सदैव मी चालतची राहिलो उरली आता, चारच पाऊले आत्ता माथ्यावरती पोहचलो आव्हानी पथ्थर पाऊलवाट दुर्दम्य! विश्वासाने चाललो सभोवार सुखदा हिरवीगार गतस्मृतीं! आठवीत राहिलो वाहतो,शीतल पवन गंधला झुळझुळ ती झेलीत राहिलो लोचनी, माझे गावकुंस सुंदर जिथे पडलो, झडलो, घडलो सारीपाट, साऱ्याच जीवनाचा मीच, आज उलगडित राहिलो — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ५९ २६ […]

सांजवेळ

येनां, सखये या सांजवेळी तुजविण, एकाकीच जगलो गतस्मृती, ओघळता नयनी मनी, मी चिंबचिंब भिजलो स्मृतीगंध! तो शिशु शैशवी त्यात सदैव, सचैल नाहलो वास्तव! सारे शुष्क जीवन दुरावा, तुझा साहत राहिलो सत्य! तुही भोगलेस जीवन सारे फक्त आठवित राहिलो सांजाळलेल्या दशदिशातुनी आठवांना उसवित राहिलो तनमन, झाले हळवे कातर प्रीतासक्त मी तुझ्यात गुंतलो येनां, सखये या सांजवेळी तुजविण, […]

ही मुग्ध रात्र मिलनाची

ही मुग्ध रात्र मिलनाची नवं यौवना नवथर तू अशी, चंद्र दुधाळ तो आकाशी रात्र ही चांदण न्हाली तू ये प्रिये अशी जवळ जरा पदर उडे वाऱ्यावर सावर जरा, गौर लव्हाळ सोन तुझी कांती ओठ तुझे नाजूक गुलाब पाकळी स्पर्श होतो मधाळ तुझा मी धुंद होतो तुझ्यात जरा, घेता समीप मी तुजला प्रिये लाजते तू हलकेच तेव्हा […]

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

मनप्रतिबिंब

कविता! म्हणजे जगणेच असते मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी जाणीवांना शब्दात माळणे असते अलवार, अंतरात झुळझुळणारी आत्मरंगी! निर्मल सरिता असते मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची भावशब्दी, पावन गंगोत्री असते अविस्मरणीय, आठवांचीच गाथा पाझरणारी तृप्त आत्मशांती असते मनामनांचे, हितगुज भावस्पर्शी शब्दभावनांचीच रिमझिम असते शब्द शब्द! वरदान ते भगवंताचे क्षणात, वेचुनी अर्पावयाचे असते शब्दा,शब्दात, भाव सत्यप्रीतीचे कवीतेत, […]

कोडगे लाचारसे

कोडगे लाचारसे मन विव्हळ हतबल आहे दिसे सभोवार धूसर अंधुक जगणे रुष्क कोरडे आहे मिळो पुन्हा जन्म जिथे हौसेला मोल आहे पापण्यांतील मोत्याला झेले जो हळुवार बोल आहे बैरागी भैरवी गाते विराणी कविता वाहे मुक्त आसवं ढाळत संध्याकाळ निमाली आहे साऱ्याला अंत आहे कष्टांना का मग नाही रोज नवे दुःख दुखणे वाट्यास वाढले आहे दयाघना तुज […]

येशील तू कधीतरी रे

येशील तू कधीतरी रे वाट तुझी ओढ लागता नकळत मोहरले मी रे गुंतून हळवे क्षण लाजता स्पर्श तुझा मज हलकेच होता अंगावर रोमांच अलगद उमटता, तुझ्या मिठीची आस व्यक्त अशी व्याकुळ मी भाव मग्न होते एकांता का भूल तुझी पडली मज रे मलाही न उमगले कातर वेळा, सोडव मोह पाश माझे हे सारे डोळ्यांत पाणी अलगद […]

गीतात सुगंधा

मनांतरीच्या भावनांना शब्दातुनी मी माळीतो अंतरातील गुज प्रीतीचे भावगीतात मी मांडितो स्पर्श! वात्सल्यप्रीतीचे स्वरगंगेसवे, गुणगुणतो गुणगुण आर्त भावनांची मी हृदयांतरी आळवितो गीता! ही प्रीतभावनांची श्वासासंगे, मी गुणगुणतो गीतात! नि:ष्पाप सुगंधा गंधाळ! जीवनी दरवळतो दिव्य! सुरम्य भावस्पर्ष प्रीतशब्दातूनी,ओघळतो लोचनी, तीच एक प्रीती मी, मलाच भुलूनी जातो कृपा ही त्याच दयघनाची मी तिला मनांतरी स्मरतो सदैव, हीच ओढ […]

वणवा

आताच दिस आला लगा मिटला मिटला कसं राहू कसं सहु जीव विटला विटला किती राबू घाम काढू सोलवटू या अंगाला परी दिसना कुठंचं एक सबूद ही ओला पेरू काय अन कुठं ओलं नाही ढेकळाला सारं कातळ कातळ पाझर नाही रं मुळाला वणव्यात लाही लाही नाही जाळं शरीराला करपून काळीज ह्ये गेलं मातीला मातीला असे सरतील दिस […]

रीतसर कांदे पोहे आणि चहा

रीतसर कांदे पोहे आणि चहा जेष्ठ लोकांच्या सोबत भेट ठरते पहा चारचौघात दोघे बघतात एकमेकांना हळूच मोठ्यांच्या समोर नजर भेट होते ती लाजून दोघांना काहीतरी तिथेच क्षणात वाटतं इथेच आपलं जुळाव हे मग जाणवत थोडस दोघांत बोलून भेट ती संपते होकार होतात दोघांत लग्नगाठ मग ठरते आकर्षण स्पर्श ओढ दोघांनाही असते लग्नानंतरचे नवीन दिवस मखमली बहरते […]

1 57 58 59 60 61 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..