नवीन लेखन...

मौन जिव्हारी

मला अजूनही कळले नाही तुझ्यात, मीच गुंतलो कसा मनास ध्यास हा नित्य तुझा नकळे तुझ्यात गुंतलो कसा जगी सारी नाती ऋणानुबंधी सत्यसाक्षी, हे अनादिकाली कां? हीच ओढ गतजन्मांची मीच तुझ्यात गुंतलो हा असा वास्तव! आज तसे दुरत्वाचे दुर्भाग्य! भाळी हे प्राक्तनाचे दग्धता ही नां कधी शमणारी तरी तव स्मरणी जगतो असा उरी आर्त ओढ प्रीतभावनांची घनमेघ, […]

एक अजून साल

घालून पोतडीत काळ उगा धावतो आहे किती राहिली किती गेली याचा हिशेब मांडतो आहे एक सोनेरी आशा उद्या म्हणून वेडा जीव सुखावतो आहे उद्या कधीही येत नसतो आज हाच रोज उगवतो आहे एकेक क्षण प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सोबतीनं वाहतो आहे हो प्रवाही सरितेसारखा डबक्यात बेडके चिकार आहेत एकेक दिस असा जगून घे जसा आज हाच अंत आहे […]

खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे

खळाळत्या पाण्यात सूर प्रवाही आहे केशर पहाट वेळी प्राजक्त दरवळून आहे मिटल्या नयनात स्वप्न अलगद मिटून आहे सोन सकाळी किरणांचे सडे अंगणी रेघून आहे मूक ओठांत शब्दांचे चांदणे मधुर आहे लाजणाऱ्या गालावरी मंद स्मित पसरुन आहे भिजल्या गात्र देही रोमांच शहारुन आहे डोक्यावर पदर बाईचा नयनात स्निग्ध भाव आहे देहाच्या बाहेर मन पिसारा मोहरुन आहे मी […]

कृपावंत

डांबले उरी, मी दुःखवेदनांना आज विकल अव्यक्त भावनां संवेदनांचे सारे स्पर्श वेगवेगळे दाह अंतरी सोसू कसा सांगना विधिलिखित! जरी हे ललाटी भोगूनी संपणार कां? सांगना सत्कर्मी! चालतोही मी विवेके तरी अस्वस्थ मन हे कां सांगना क्षण! तू तर सारेसारे जाणतेस तरीही तू कां? अबोल सांगना मीच शोधितो, स्वतःला अंतरी जीवन! कधी उमगणार सांगना जीव! हा व्याकुळ […]

बाईपण

अडखळू नकोस सखे बोल जे आहे मनात नको संकोच होउदे संवाद का घुसमटून श्वास कोंडतात? नकोसे म्हणावे नको हवे तेचं घ्यावे पदरात मोह होता, कर स्वीकार उत्सव होउदे रोजच्या जगण्यात आकसू नको तू बाईपणाने ताठ माने चाल जनात सुसाट सुटुदे भात्यातील तीर कर्तृत्वाने उजळू दे स्वत्व येणाजाणारा टोचरा धक्का बसू नको तू आता सहत विरोध कर […]

सुखाला माहीत नसते

सुखाला माहीत नसते दुःखाचे दुःखद उमाळे अर्थाला माहीत नसते अनर्थाचे घातक सोसणे शब्दांना माहीत नसते वाक्यांचे अर्थ सारे वाक्यांना माहीत नसते शब्दांचे भाव सारे प्रेमाला माहीत नसते मायेचे पड वेगळे मायेला माहीत नसते प्रेमाचे आंधळे वागणे सुराला माहीत नसते लयाचे बोल न्यारे लयाला माहीत नसते सुराचे स्वर सारे वेगळे आनंदाला माहीत नसते वाईटाचे दिवस वेगळे वाईटाला […]

नभ प्रीतीचे

नभ तव स्मृतींचे, ओघळते लोचनी वाटते तुझ्या प्रीतीत विरघळूनी जावे ठोके स्पंदनाचे दंग तुझ्याच आठवात सभोवार दूजे काय आहे मला न ठावे मनमंदिराच्या गाभारी तुझीच गे मूर्ती निरंजनी दीपणारे तव रूप मज भावे अजूनही अंतरी निनादते राऊळ घंटा तुझी, पाऊल प्रदक्षिणा श्रद्धा जागवे जणू तूच राधा मीरा भक्तीत दंगलेली निरागस त्या भक्तीरुपात हरवूनी जावे कशा, किती? […]

नववधू सखे

अंग हळदीत न्हाले म्हणून हुरळू नकोस गं आता हळदीचा रंग रोज अनंत छटांत गं अक्षता त्या रंगीत येता वाट्यास गं आता तसे शुभ्र कण निवडून तू रांध गं तुझ्यातले जे भले बुरे दिसेल अगदी उठून गं आधी लपेटी सारे मायेच्या मखमली पदरी गं बोल लावील कोणी तेव्हा कोसळून उन्मळू नको गं समजून उमजण्या वेळ लागे तेव्हा […]

त्या सांज सावल्या किरण सोनेरी

त्या सांज सावल्या किरण सोनेरी एकांत मनास जाईल मोहवूनी कितीक आठवणींचा पसारा पसरुनी हरवल्या वाटा माखून धूळ वारा धुसरल्या सांजवेळी किरणांच्या रांगोळीचा आकाशी सजला सोहळा तो रवी अस्त आज अवचित झाकोळला निमिष क्षणभर थांबले मेघ भरलेले डोळ्यांत अलगद पाणी ओथंबलेले वळचणीस सांधले कुड कौलारु काही कवडसे प्रकाशले गर्त भाव वेळी पागोळीत थेंब पाण्याचे साचले काही उमळल्या […]

कांचनकिरणे

मौन पांघरुनी चोरपाऊली यामिनी, चांणदे पेरीत येते नि:शब्दी, अव्यक्त भावनां अलवार मिठीत घट्ट मिटते दाटता काळोख नभांगणी घरट्यातुनी विसावतो जीव प्रतिक्षा! मौनात प्रभातीची चाहूल, सोनपाऊली सजते प्रसन्न! उषा किरण कांचनी जगण्यासाठी देते आत्मबल तेजाची ही कोवळी किमया चैतन्याला, उधळीत उजळते — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ५३. १९ – २ – २०२२.

1 58 59 60 61 62 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..