नवीन लेखन...

वेडा चंद्रास्त

केशरी क्षितिजी त्या चंद्राची कोर सोबत चांदणी फिरते सभोवार दाटलेल्या सांजवेळी परतून येई सारी पाखरं नसे उजेड संपूर्ण नाही काळोख फार सोबती निघे तो चंद्र जिथवर जाई नजर जणू सखा सोबती प्रेमळ मृदू अलवार निर्मळ नितळ मनी उगी उठे हुरहूर कातळास का कधी सांग फुटेल पाझर रेंगाळू नकोस तेथे तू वेळी सावर आता मनास वेड्या तू […]

ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते

ती कुंकू लावते मंगळसूत्र घालते मग तिला नावं ठेवली जातात पण या नावं ठेवणाऱ्या काही बायका फॅशन म्हणून वेगवेगळी मंगळसूत्र घालतात तिने हळदी कुंकू केलं म्हणून मागासपणा काहीजणी म्हणतात पण किटी पार्टी असते खरी यांची ती पण नावाला या हळदी कुंकू आहे म्हणतात संस्कार संस्कृती जपली तर बॅकवर्ड ठरतो हाय फायच्या नावाखाली सरळ सण परंपरा नाकारणं […]

स्वामी सत्ताधारी

प्रवास! जन्म मृत्यूचा कर्माचाच दृष्टांत जसा श्वास केवळ पराधीन क्षणीक बुडबुडा जसा। स्वामी! सत्ताधारी एक ब्रह्माण्ड मुठीत त्याच्या सृष्टीसवेची पंचमहाभूते त्याचा आविष्कार जसा। भाग्यवंती जन्म मानवी भोगणे, प्रारब्ध संचिती कृपाळू! तोच दयाघनी जगवितो अलवार जसा। प्रहर! सारे साक्ष त्याची नक्षत्र,ग्रहगोल,तारे सारे रूप त्याच अनामीकाचे उभा लोचनी तोच जसा। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. ५१. १८ […]

निरागस बाल्य

मनात, माझिया सहजची येते निरागस! बाल्य पुन्हा परतावे रुसुनिया हवे तेव्हडे हट्ट करावे निरागस! बाल्य पुन्हा परतावे।। सख्यासोबती, खेळावे भांडावे रडुनीही, पुन्हा गळ्यात पडावे हा खेळ आनंदी खेळण्यासाठी निरागस! बाल्य पुन्हा परतावे।। स्वार्थ, हव्यासाची नसे मनीषा परमानंद! भाबडाभोळा केवळ निष्पाप मैत्र, मनी प्रीतभावनां ते निरागस बाल्य पुन्हा परतावे।। सभोवती प्रांगण सारे मुक्तानंदी न कधी द्वेष, असूया […]

शोध आत्मसुखाचा

जगलो जरी सारे खेळ प्राक्तनाचे तरी अर्थ जीवनाचा कळला नाही भाळीचे, भोग भोगले जरी सारे हव्यास मनीचा अजूनी सरला नाही जडली नाती, जगता जीवन सारे गूढ नात्यांचे आजही उकलले नाही सत्य ! जन्मदात्यांचेच ऋणानुबंध अन्य रक्ताची नाती कळलीच नाही सारेच माझे, म्हणता संपला काळ ओढ प्रीतीची ती जाणवलीच नाही सांगा, या मनालाच कसे सावरावे काहूर ! […]

माणसांना उभे करणारे शब्द !

” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी – […]

मूलमंत्र सुखाचा

निरपेक्ष, निस्वार्थी जीवन मुलमंत्र परमानंदी सुखाचा जे घडते, ती प्रभुची ईच्छा करू नये, संताप जीवाचा स्वेच्छेने, जगु द्यावे सकला जगणे अधिकार प्रत्येकाचा अटकाव, बंधनांचा नसावा हाच विवेकी मार्ग शांततेचा मन:शांती! केवळ तडजोड नसावा संघर्ष वादविवादाचा सूत्र, मौनं सर्वार्थ साधनम मुलमंत्र! हाची धागा सुखाचा सर्वांशी सदा सुखानंदी रहावे मनी रुजावा मुलमंत्र सुखाचा — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना […]

वैभवी प्रीती

आठवांची तुझी सावली वैभवी प्रीतीच्या सुखाची स्वरांचे, सप्तरंगी चांदणे जीवलगी फुले बकुळीची भुलवितेस तूंच अंतराला मनी दाटे गर्दी भावनांची स्पर्श हिरवळेल्या ऋतूंचे गुंफण गीतात भावनांची मनी! रंगगंध ते सुमनांचे मकरंदा! गोडी अमृताची हृदयी, आठवांची सुखदा साक्ष! वैभवी मांगल्याची — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. ४५. १३ – २ – २०२२.

भेटीची तीव्र आंस

  वाटते आता भेटावेसे संथची,जाहली स्पंदने गात्री थरथर कंपनांची तुझ्या प्रतीक्षेत लोचने जाहली, प्रीती व्याकुळ अंत:करणी, दग्ध जीणे नि:शब्दी, सारे अंतरंग मनी, ओढ तुला भेटणे लावी हुरहूर, काळजा नभांगणाचे झाकोळणे सांजाळलेल्या क्षितिजी आंस! एक तुला भेटणे अजूनही, जीवंत आशा दशदिशात, सत्य प्रीती लडिवाळ प्रीत अमरत्वी हे सारेच भगवंतांचे देणे — वि.ग.सातपुते.(भावकवी). 9766544908 रचना क्र.४४. १२ – […]

परमात्मा

पुण्यपावन हे दत्तधाम कृष्णाकाठी, भक्तीचे त्रैलोकी शाश्वत कृपाळू स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।। निश्चिन्ततेच्या महासागरी दर्शन आगळेच पंचत्वाचे दत्तगुरू, अखंड कृपाळु माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।। तृप्तीचे श्वास तिथे निरंतर मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे जीवास नाही, घोर चिंता ध्यास मनहृदयी विरक्तीचे।। मन ब्रह्मानंदी विरुनी जाते सत्य, दर्शन होते आत्म्याचे परमात्मा! तो परमकृपाळु रूप! भवसागरी दत्तकृपेचे।। — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ४३.  […]

1 59 60 61 62 63 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..