नवीन लेखन...

ऋणमुक्त

मनी घोंगावते मोहोळ स्मृतींचे जेंव्हापासूनी मज कळु लागले मनहृदयी! ती सारीच ऋतुचक्रे आज सारे सारे, आठवू लागले।। वात्सल्य,प्रीत,मैत्र, सखेसोयरे पुन्हा, या जीवा खुणावू लागले क्षण सारे सारे, हृदयी कोरलेले गुज अंतरी, आजला उकललेले।। सुख, दुःख, आंनद, जिव्हाळा भोग सारेच, जे प्राक्तनी लाभले बंद पापण्यातुनी, सारे तरळलेले अव्यक्त मनीचे, आज सांडलेले।। रुजले, फुलले, गंधाळले जीवन असाध्य, ते […]

पाहुणचार

जीव भुलोकीचा पाहुणा अनिश्चिती,या स्पंदनांचा संपता, पाहुणचार दैवी घेतो जगी निरोप सर्वांचा।। गतजन्मांचीच सारी नाती याच जन्मी, ऋणमुक्तीची चित्रगुप्ताच्याच चोपडीत चोख हिशेब सारा सर्वांचा।। सलोख्याने ऋणमुक्त व्हावे निजानंदी! निजसुख घ्यावे निरपेक्षी सुखदा ही आगळी मना ध्यास असावा मुक्तीचा।। जीवनी, सुखरूपताच शांती निर्मोही! प्रीतीस्पर्श सदानंदी वरदान! कृपावंती तेच ईश्वरी श्रद्धाभाव रुजवावा भक्तीचा।। — वि. ग. सातपुते.(भावकवी) 9766544908 […]

सत्य सुर्यप्रकाशी

शब्द जरी जाहले अबोल मौनी मन, मनाशी बोलते द्वंद्व! ते सत्य, असत्याचे जीवाला सदा खात असते कर्म! मनी बिलोरी आरसा स्वचे, खरे प्रतिबिंब दिसते जरी प्रतारणा जगाशी केली सत्यता उरीची जीवा छळते सर्वांती नोंदणी ती चंद्रगुप्ती लेखाजोखा, सामोरी मांडते जन्म! कर्म विवेकी, संचिती अर्थ! मुक्ती, मोक्षाचा सांगते प्रीती, सद्भावना सदा सांगाती सत्य! सूर्यप्रकाशी समोर येते — […]

शोधतो अजूनही

आज अचानक मी तुला पाहता भावतरंग मनीचे, उमलुनी आले निर्माल्याचाही तो गंधाळ सुगंधी गगन, गतस्मृतींचे दाटुनी आले सांग सखये, काय काय आठवू लोचनी, तुझेच भास तरळलेले खुणा! तुझ्या पावलो, पाऊली आठव सारेसारे, हृदयी रुतलेले अजुनही छळतो, तुझा अबोला मन! अधीर हे तुझ्यात गुंतलेले लाघवी प्रीती, चैतन्य स्पंदनांचे मन! तव प्रतीक्षेत घुटमळलेले आज अचानक मी तुला पाहता […]

मीच एक सर्वज्ञ

जगीचा, साराच छद्मीपणा सुज्ञजन, सारे ओळखून आहे सत्यता! विकृत मनांमनांची साऱ्यांनाच, तशी ज्ञात आहे काही, आत्मप्रौढी मिरविणारे स्वतःला मी सर्वज्ञ मानत आहे ते झाले जरी, थोडे आत्ममुख स्वओळख त्यांची होणार आहे जो शहाणा त्याचा बैल रिकामा माणसा ही जगाची रहाटी आहे मी,पणाचा आव कुणा नसावा गर्वाचे घर नेहमीच खाली आहे नम्रता, कृतज्ञता सदा वंदनीय मीत्व! सर्वथाच […]

व्हॅलेंटाईन डे

समाजमाध्यमांवर काल एकच धमाल होती, Valentine शुभेच्छा दुसरी पोस्ट नव्हती. Valentine प्रेमाच्या लाल लाल रंगात – कुणी अगदी विरोधी सूर लावत होतं , “प्रेमाचं नुसतं प्रदर्शन” वर हे ही ठेवून देत होतं. ही मंडळी नेहमीच अशी का असतात ?, छान , गोड गोष्टींना नावं का ठेवतात ? “हा डे कोणाचा ? कुणी सुरू केला ?” – […]

शरण तुला भगवंता

वारा होता झंझावात पावसाचा माराही जोरात जग गेले होते तेव्हा बुडून गडद अंधारात कारागृहात एक तेजस्वी दिव्य बाळ जन्मले बघूनी आईबापांचे काळीज गलबलून गेले तो काळ येण्या आधीच सांभाळली ती वेळ पण बाळाला लागता कामा नये त्याची झळ पाऊस वारा विजांचा एकच होता मारा तरीही टोपलीतील बाळासह धावत सैरावैरा यमुनेलाही आला होता महा भयंकर महापूर त्यातून […]

नृत्य कला मज दे रे राम

गणराज नाही रंगले नाही नाचले गोकुळी सारे नाचून नाही दमले वीणा नाही वाजली या शारदेची थुईथुई की हो थांबली सर्व मोराची डफावर नाही पडली शाहिराची थाप आवेशाची तिडीक जिरली आपोआप ढोलकीच्या तालावर नाही थिरकले हात लावण्याने नाही रंगली रसिकांची रात अबोल का ग झालीस तू आता सतार कुणाचीही फिरली नाहीत बोटे हळुवार टाळ बोले चिपळीला आता […]

हास ग घुमा कशी मी हसू

या गावचा त्या गावचा पाहुणा नाही आला आमरस पुरीचा बेत नाही झाला कशी मी हसू या गावची त्या गावची लेक नाही आली साडी चोळी नाही केली कशी मी हसू या गावची त्या गावची सून नाही आली वाळवणंच नाही झाली कशी मी हसू याच गावाची मैत्रीण नाही आली पार्टी नाही झाली कशी मी हसू इथे तिथे नाही […]

भात पुराण

वरण भाताच्या मुदिवर तुपाची धार, पिळायचं लिंबू मग येते बहार. तोंडी लावायला बटाट्याची गोल कचरी, यापुढे पक्वांनांची काय सांगा मातब्बरी?. दहिबुत्ती म्हणजे सांगतो तोंडाला पाणी, भातावर दही, वर जिऱ्या तुपाची फोडणी. ताकातली मिरची तळून कुस्करायची वर, पोह्याचा पापड असेल तर नुसता कहर. नारळी भाताचा स्वाद, दरवळ संपूर्ण घरात, पावलं वळतात अलवार स्वयंपाकघरात. आंबेमोहोर तांदूळ, त्यात नारळ,गूळ […]

1 60 61 62 63 64 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..