नवीन लेखन...

हास ग घुमा कशी मी हसू

या गावचा त्या गावचा पाहुणा नाही आला आमरस पुरीचा बेत नाही झाला कशी मी हसू या गावची त्या गावची लेक नाही आली साडी चोळी नाही केली कशी मी हसू या गावची त्या गावची सून नाही आली वाळवणंच नाही झाली कशी मी हसू याच गावाची मैत्रीण नाही आली पार्टी नाही झाली कशी मी हसू इथे तिथे नाही […]

भात पुराण

वरण भाताच्या मुदिवर तुपाची धार, पिळायचं लिंबू मग येते बहार. तोंडी लावायला बटाट्याची गोल कचरी, यापुढे पक्वांनांची काय सांगा मातब्बरी?. दहिबुत्ती म्हणजे सांगतो तोंडाला पाणी, भातावर दही, वर जिऱ्या तुपाची फोडणी. ताकातली मिरची तळून कुस्करायची वर, पोह्याचा पापड असेल तर नुसता कहर. नारळी भाताचा स्वाद, दरवळ संपूर्ण घरात, पावलं वळतात अलवार स्वयंपाकघरात. आंबेमोहोर तांदूळ, त्यात नारळ,गूळ […]

व्याख्या प्रेमाची

प्रेम म्हणजे नसतं , नुसतं उमळून येणं , किंवा नसतं एकमेकात , सतत विरघळून जाणं. प्रेम म्हणजे प्रणयाचा – नसतो फक्त आवेग , प्रेमात नसते कुठेही – आखायची भोज्जाची रेघ. प्रेम म्हणजे असतं , समजून घेणं दुसऱ्याला , तोंड मिटून शिकायचं , मनापासून ऐकायला. प्रेमाला पुरतो दोघांचा , फक्त निर्मळ सहवास , ‘ मी आहे ‘ […]

सूर ऐकू दे रे

तुझ्या मुरलीचे सूर ऐकू दे रे. गोविंद गोविंद हरे मुरारे.. आम्हावर रुसलास की कोपलास. जाणवत आहे जीव होतोय कासावीस.. म्हणतात सारे. नको आता औषध वा दवा. फक्त कामीच येईल तुझीच दुवा.. वनी खेळत होतास तू सवंगड्या समवेत. आमची लेकरं मात्र ठेवलीस कोंडून घरात. नंदलाल मिळू दे त्यांनाही बालपणाचा आनंद. त्या साठीच तुझ्या बासरीचे सूर लागू दे […]

बिकट वाटा

अनभिज्ञ बिकट वाटा अगतिक जिद्दी पाऊले ध्येय खंबीर वाटसरूंचे अथक नित्यची चालले वळणेही, वेडी वाकडी अंदाज, सारेच आंधळे साथ अनामिक वाटाडा हातात हात धरुनी चाले साक्षी,स्पर्श त्याचे ग्वाही निःशंक! जगती चालले चराचरी न कुणीही एकटे रूप श्रीचे सोबती चालले हेच अतर्क्य, अगम्य सारे सुखनैव! चिरंजीव राहिले — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ३६. ५ – २ – […]

दृष्टांत

सांगा किती किती सावरावे किती समजवावे या मनाला प्रवाहा विरुद्ध, पोहणारा मी कां? विसरू भोगल्या क्षणाला सद्गुणी सहवासातची जगलो जगी अर्थ जगण्याचा उमजला सोबतीला, थवे जरी निंदकांचे दुर्लक्षूनी, मी सावरले स्वतःला विवेके, संयमे या जगी जगावे सांभाळीत साऱ्या मनामनाला दिशाहीन वाऱ्याचेच ते वाहणे पंचमहाभूतांची सोबत सृष्टीला सोहळे, ऋतुचक्रांचेच त्रिलोकी दृष्टांत! ईश्वरी दाविती मानवाला — वि.ग.सातपुते. (भावकवी) […]

गीतांजली

निरागस भावनांची गीतांजली निर्मली, भावफुलांची रंगोली दीपज्योत! अंतरी संवेदनांची निक्षुनी! सुरेल सत्य गुंफलेली सात्विक, प्रीतभाव मनसागरी अलवार प्रसवती शब्द ओंजळी राशी! सुखदुःखांच्याच ललाटी झरझरते भावगंगा ओथंबलेली झाले मुक्तमोकळे, अव्यक्त मन शब्दफुले! कवितेतूनी गुंफलेली काव्यप्रतिभा! वरदान दयाघनी प्रतिभा! जणु प्रांगणी मंतरलेली — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ३४. ३ – २ – २०२२.

आत्म्याचे रूप

बिलोरी दिसते प्रतिबिंब तेच कां ? रुपडे आपुले कसा ? शोधावा आत्मा कोणते ? रूप ते आगळे।। माया सारीच दयाघनाची रुपात, साऱ्या तोच एक देही, तो चिरंजीव आत्मा दावितो जगण्याचे सोहळे।। जीव! सृष्टीत या विनाशी कृपावंत! तो जगविणारा जाणावे, त्यालाच निरंतर रूप आपुले त्यात दडलेले।। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र.३३. २ – २ – २०२२.

जन्ममृत्यू

हेही माझे, तेही माझे वादविवाद उगा कशाला जे जे आहे ते उपभोगावे सुखे जपावे मनामनाला जन्मी लाभो, मन:शांती मूलमंत्र हा परमसुखाचा स्पंदनेही, इथे अशाश्वत सांभाळावे जीवाजीवाला संचित, सारे ते सत्कर्माचे जन्म, मानवी युगायुगांचा येणे, जाणे रिक्त ओंजळी निर्मोही, बिलगावे मृत्यूला सत्य! जगती या जन्ममृत्यू अमरत्व,न लाभले कुणाला रामकृष्णही, इथे आले गेले सत्यसाक्ष ही या चराचराला — […]

सुखदा लाघवी

डोळे भरूनी, मिटूनी पापणी नीत नीत मी! तुजलाच पहावे उघडिता नयन! तूं सहज लपावे दिसता क्षणभर! तूं हळूच हसावे ।। १।। सुखदा लाघवी! हॄदयी फुलावी ब्रह्मकमळ! ते प्रीतीचे उमलावे हितगुज हे! मनामनांचे उमजावे संचिती प्रितिस या घट्ट बिलगावे ।।२।। उमलता फुले! अंतरी गंधाळावे सजता सृष्टी! सप्तरंगा श्रृंगारावे उपभोगुनी! सोहळे ऋतुऋतुन्चे विरघळूनी प्रितीत! आनंदी जगावे ।।३।। प्रीतफुल […]

1 61 62 63 64 65 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..