नवीन लेखन...

भेट नां सांजवेळी

प्रीये, सखे मनस्वामीनी ये नां, सत्वरी सांजवेळी नको नां, आता प्रतीक्षा भेट नां, सत्वरी सांजवेळी।। गोधुळीची धूळ गोकुळी जित्राबांचे, ठसे गोखुरी छुमछुम नादती घुंगराळे भेट नां, राधिके सांजवेळी।। सावळबाधा तूंच सावळी ब्रम्हांडी! तुझी पडछाया पावरीची, रुणझुण कंठी नेत्री घन:श्याम सांजवेळी।। वृंदावनी तेवते दीपज्योती वैखरी, झरते शुभंकरोती तूच मूर्त, प्रसन्न मनगाभारी भेट नां, राधिके सांजवेळी।। अस्ताचलीच्या, वेदिवरती […]

नाहीच जमलं रे

नाहीच जमलं रे तुला हलकेच विसरायला भाव मनातला हळवा खोडून मिटून टाकायला नाहीच जमलं रे मिठीतल्या भावनेला खोडायला मोह तुझ्या गोड मिठीचा नाहीच जमला पुसायला नाहीच जमलं रे तुझ्यात गुंतून बाहेर यायला ओढ तुझी अलवार तुझा विरह अबोल मिटायला नाहीच जमलं रे तुझ्यासारखे मला तोडायला गुंतून गेले तुझ्यात आल्हाद तुझ्या जाणिवा तुटायला नाहीच जमलं रे तुझी […]

कसली ही चांदण चाहूल सख्या

कसली ही चांदण चाहूल सख्या काहूर उठतात मनात अनेकदा, हे मोती धवल शुभ्र टिपूर असे शिंपल्यात हृदय चोरुन माझे आता तुझी ओढ लागते हलकेच ती मिटतात नयन माझे अलगद तेव्हा, ये सख्या तू असा घनशामल वेळी मी अबोल गुंतली तुझ्यात आता ये बहरुन सख्या तू असा भाव गंधित मोहरून जरा, स्पर्श तुझा मधुर मज होता मोरपीसी […]

प्रतिभा

या प्रतिभेचे उपवन मनोहर आत्मानुभूतीचा साक्षात्कार संवेदनांचे लाघवी कुंजनवन लोचनी तरळत रहावे निरंतर प्रतिभा! वरदान सरस्वतीचे भावनांचे, अमृतकुंभ विवेकी दैवेप्रारब्ध्ये, प्राशिता अविरत भावाविष्कार! उमलतो निरंतर लडिवाळ भावनांची शब्दफुले कुरवाळीती या तनमनांतराला साक्षात प्रतिभेचे रूप सोज्वळ मम हृदयी, रुणझुणते निरंतर अलवार टपटपती शब्दकोमली मी, वेचितवेचित माळीत जातो अनामिकाची, ती कृपा आगळी मी, लिहीत रहातो असा निरंतर — […]

रागाच्या साऱ्या शब्दांवर

रागाच्या साऱ्या शब्दांवर अनुराग ही अबोल झाला न कळल्या अबोध वेदना दुःखाचा थेंबही पापणीत मिटला मनुष्य जन्म लाभला असा तरी सार्थक भाव लोपला न कळत्या जाणिवांना मग कुठे किनारा न मिळाला प्रेमच सुंदर अंतिम जीवनी तरीही वेदनेचा डोह पेटला अनुरागच जीव गुंतवी हृदयात मोह मनात मोहक फुलता जीवनात प्रश्न अनेक पडती न उत्तरे मिळतात कित्येक प्रश्नांना […]

आठवणींचे शिंपले

आठवणींच्या लाटांमधले मी शिंपले जेव्हा वेचत जातो सुखस्वप्नांचे संचित काही जणू अलगद वेचत जातो ओंजळीत भरून मग ते किनाऱ्यावर जरा टेकतो गाज सागरी ऐकत ऐकत सांजदीवा लुकलुकतो कुठूनसा मग वाहत येतो धुंद ओला पश्चिमवारा हळू हळू मग उमगत जातो सुखस्वप्नांचा अर्थ खरा…. — आनंद

पराधिनता

अटळ दान, जीवा मृत्यूचे त्याला कधीच घाबरू नये सात्विक, वात्सल्यामृताचे कधीच विस्मरण होऊ नये प्रीतभाव! उर्मी स्पंदनांना त्याचा तिरस्कार करू नये भोग भाळीच्या दुष्टचक्रांचे भोगता, ईश्वरा विसरु नये जन्ममरण! सत्य चराचराचे असत्य! कधीच समजू नये पराधिनता, हा जन्म मानवी देह! अमर्त्य कधी समजू नये विवेकी! सदा सत्कर्म करावे आविचार, मनांतरी करू नये स्मरावे! कृपावंती दयाघनाला अश्रद्धा! […]

सहज मिटल्या डोळ्यांत

सहज मिटल्या डोळ्यांत का तू अलगद आठवावा पाऊस मनात रिमझिम का तू मनात आल्हाद मिटावा कसली ही भूल मनीची आरक्त मी तुझ्यात व्हावी न उलगडले गुपित मज हे का तुझी वाट मी पाहवी कसले हे चांदण टिपूर हृदयाची हितगुज उमलावी न बोलता मी अबोल अशी अंतरीची साद तुला कळावी येशील का रे तू असा नदीकाठी मी […]

वरवर आनंद ती दाखवत होती

वरवर आनंद ती दाखवत होती अंतरी दुःख अबोध खूप होती तडजोड संसारात सदा मग देहाची आहुती तिचीच होतं होती न कळल्या वेदना तिच्या कुणाला न कळली दुःख कुठलीच काही रोज ती रडणारी व्याकुळ हरिणी मायेत हरवुन अबोध दुःखद होती न प्रेम,न माया कौतुक कसले नाही रुक्ष संसारात गुरफटून मन मारुन होती मन नव्हते जुळतं न भाव […]

जगी न्याय आंधळा

हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।। या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई मंदिरात, धनिका दर्शन आधी निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।। कलियुगाची हीच रित असली कुठली नाती अन कुठली प्रीती कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।। जो तो हवा तसा धावत सुटला विवेक सारा […]

1 62 63 64 65 66 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..