नवीन लेखन...

मंगळसूत्राच्या काळ्या मण्यामध्ये

मंगळसूत्राच्या काळ्या मण्यामध्ये ती बांधली जाते संसार धाग्यामध्ये सोन्याच्या वाट्या दोन चमचम करतात गळ्यात तिच्या सोनेरी मणी चकाकतात मंगळसूत्र असलं गळ्यात की बाहेरच्या लांडग्याची नजर जास्त नसते घरातल्या माणसांत मात्र तिची ससेहोलपट कुठेतरी होत असते असतो नवरा त्या वाटयाशी बांधलेला प्रेम मात्र नसते संसार वाट्याला ती रडते रुसते हरवते बावरते पण कुणालाच कळत कधी नसते तिच्या […]

शब्द संवाद

केंव्हातरी शब्द संवाद होतो पडतात, बोल तेव्हडे कानी केवळ खुशाली मात्र कळते अव्यक्त मनीचे ओठी थबकते हेच आता अंगवळणी पडले सुख! जणू चाटण मधासारखे अवीट तो आनंद देऊनी जाते अव्यक्त मनीचे ओठी थबकते बोलती निरपेक्ष अधीर लोचने अंतरी झरझरते निष्पाप प्रीती मनभावनांचे विशुद्ध गंगाजल ओंजळीत अर्ध्य म्हणुनी येते मौनात! अंतरीच्या प्रीतभावनां सोज्वळ सात्विकतेच्या बंधनात जन्म सारा, […]

मनी भाव अंतरी तुमचा ठाव

मनी भाव अंतरी तुमचा ठाव सद्गुरु महाराज तुमचेच नाम २१ अध्याय पूर्ण पारायण होता महाराज तुमची कीर्ती अनादी अनंता गण गण गणात बोते मंत्र प्रभावी चिंता सोडवी सद्गुरुच्या पायापाशी बंकटलालासी तुम्ही प्रथम दर्शन दिले शेगाव नगरी प्रति पंढरपुर झाले प्रत्येक अध्याय वाचता मनोभावे संकट निवारण होतील सहज सारे नसे मागणे महाराज तुमच्यापाशी अज्ञान बालक मी घ्या […]

आठवांचा पाझर

मी अजूनही तुझ्याच आठवात दंगतो बेजार, प्रीतभावनांनाही कुरवाळीतो मिटलेल्या पापणीतही अस्तित्व तुझे तरीही लोभस चराचरी तुला शोधितो गुलाब, जाईजुई, बकुळ, मोगरा चाफा तुझ्याच स्मृतीतुनी,अजूनही दरवळतो सृष्टीत साऱ्या हिरवळलेले चैतन्य तुझे पाहता, भावनांचा बहार उमाळून येतो अवखळ निर्झर,तुझ्या ओल्या स्मृतींचा माझ्याच भाबड्या अंतरातुनी पाझरतो आज सामोरी झाकोळलेले हे तारांगण तरीही, मी तुझ्याच आठवासंगे जगतो — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

सत्संग

मला एकटे, जगण्याचा सराव नाही जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो तोल सांभाळणे अजुनी जमले नाही भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी वेदनांची, कधीच फिकीर केली नाही वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी जगतांना, मी कधीच कुरकुरलो […]

कोमेजल्या फुलांचा गंध

कोमेजल्या फुलांचा गंध वाऱ्यावर उडून गेला बाई निर्माल्य झाले सुकून त्याचे कोमेजल्या कळ्या काही दुःख माणसाचे न दिसते कधी केव्हा कुठलेच काही परी दुनिया शिकविते धडे हजार उपदेश रोज करुनी विरल्या भावनांचा निचरा न मोकळा कुठे कधीही गर्तेत गोल फिरतो वारा उडून पाचोळा वेदना सारी मनाच्या कातर वेळा निःशब्द साथ सुटतील कोडी आप्त जातील सोडून सारे […]

आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान

आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान शाळेत असताना व्हायचे असे झेंडा वंदन भल्या पहाटेच आम्ही उठून गणवेश घालून पळत पळत ओळीत उभे रहायचे जाऊन मग निघायची मोठीच्या मोठी. प्रभातफेरी पालक उभे रहात कौतुकाने दारोदारी भारतमाता की जय. वंदेमातरम गर्जत असू पालक डोळ्यातील आनंदाश्रू असत पूसू आम्ही पुढे पुढे वेगात तर बाई यायच्या मागे धावत मुलांना […]

बाजार

उभी कोपऱ्यात शहराच्या, ती वस्ती लाल दिव्याची. अभिशाप भोगत असते, रात्रीच्या अभिसाराची. सकाळ होई दुसऱ्या प्रहरा, शीण कायेचा तो सारा. अंमल वारुणीचा असे अजूनही, वस्त्रांचे भान ते नसे जराही. झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी, कवळिती तयांना छातीशी धरूनी. बिलगती कुस मिळे मायेची, कसर रात्रभराच्या विरहाची. स्नान करूनी हात जोडुनी, देवाला सजविती फुलांनी. करेल काय?निराकार तो ही, चुरगळा […]

कधी हसावे कधी रडावे

कधी हसावे कधी रडावे जीवन गाणे गात रहावे आयुष्याच्या वेलीवर मग चार माणसे हसत जोडावे कोण न कुणाचा असा इथे दुःखाचे थेंब हास्यात बुडावे रडता रडता पटकन हसावे हसता हसता मरणं यावे औट घटकेचा खेळ सारा जमतील सगे सोयरे सारे मरणं येईल कधी समोर शब्दांतून हास्य अलगद खुलावे असतील आपले नाते कुठले काव्यांत ओळख उरेल जराशी […]

अंतरीचा अबोध आवाज

अंतरीचा अबोध आवाज स्वामीना द्यावी हाक धावून येतील सत्वर होतील अद्भुत चमत्कार लीला अपार केल्या असेल सगळ्यात साथ पाठीशी असतील स्वामी मग कशाला चिंता भाव एक एक मार्ग सारे स्वामींच्या चरणी असावे कितीक येवो संकटे मग भिऊ नको हा मंत्र तारुन जावे नसावे कमी अधिक नसावा राग भेदभाव स्वामींपुढे न कोण मोठे मग न ठेवावा कुठला […]

1 64 65 66 67 68 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..