नवीन लेखन...

कधी हसावे कधी रडावे

कधी हसावे कधी रडावे जीवन गाणे गात रहावे आयुष्याच्या वेलीवर मग चार माणसे हसत जोडावे कोण न कुणाचा असा इथे दुःखाचे थेंब हास्यात बुडावे रडता रडता पटकन हसावे हसता हसता मरणं यावे औट घटकेचा खेळ सारा जमतील सगे सोयरे सारे मरणं येईल कधी समोर शब्दांतून हास्य अलगद खुलावे असतील आपले नाते कुठले काव्यांत ओळख उरेल जराशी […]

अंतरीचा अबोध आवाज

अंतरीचा अबोध आवाज स्वामीना द्यावी हाक धावून येतील सत्वर होतील अद्भुत चमत्कार लीला अपार केल्या असेल सगळ्यात साथ पाठीशी असतील स्वामी मग कशाला चिंता भाव एक एक मार्ग सारे स्वामींच्या चरणी असावे कितीक येवो संकटे मग भिऊ नको हा मंत्र तारुन जावे नसावे कमी अधिक नसावा राग भेदभाव स्वामींपुढे न कोण मोठे मग न ठेवावा कुठला […]

सारे ओळखून आहे

जरी, मी नसलो मनकवडा तरी मी सारे ओळखून आहे समोरचे हास्य बेगडी नाटकी मनभाव सारे ओळखून आहे सत्य असत्य लोचनी तरळते सद्भावनां! अंतरास सजविते मन निर्मळ सुखानंदाचा झरा सारेच मी शब्दात गुंफतो आहे कां ? उगाच उणेदुणे उसवावे जे छळते मनास, ते विसरावे विवेके! सदा जगुनी जगवावे एव्हढेच आपुल्या हाती आहे मैत्र! लाभणे, भाग्य भाळीचे निर्मळ! […]

गुलाबी थंडी आल्हाद गारवा

गुलाबी थंडी आल्हाद गारवा छेडीते मज ही धुंद गार हवा मादक नाशिली रात्र धुंदावली शिशिरातील चांदणे तारका हासली अलवार मिठीत घे वेढून तू मजला ओठ ओठांनी अलवार टिपून घे जरा मदमस्त हवा तू ये जवळ असा पदर ढळतो होईल वारा अवखळसा अलगद मिठीत घेशील तू मजला साखर चुंबनात लाजेन मी तेव्हा रात्र रसिली धुंद गुलाबी गंधित […]

स्वप्नांतल्या चांदण्यात एकदाच

स्वप्नांतल्या चांदण्यात एकदाच तू भेटून जा मोहरल्या मनातील गंध तू असा लुटून जा साद हलेकच तुला देते प्रतिसाद तू देऊन जा अंतरातील भावनांची ओल अलगद तू मिटून जा रातराणीच्या सुवासात आल्हाद तू दरवळून जा अलवार मिठीत तुझ्या तू मला टिपून जा दव भरल्या धुक्यात तू हरवून जा स्पर्श माझा मलमली तू जरासा मोहरुन जा ओढ लागली […]

तूच कवीता

तूंच गे , अंतरीची कविता सुगंधा , तूच गे मनसुंदरा प्रीतफुल , बकुळ लाघवी जगविते , माझिया अंतरा।। तूं रंभा , उर्वशी , मेनका भूलोकीची या स्वर्गसुंदरा तूच गे स्वर , शब्दचांदणे प्रतिभा ! तूच गे भावसुंदरा।। तुझ्यासंगे , शब्द उमलती भावनांचेच ! घन आभाळी मिठीत घेता , मी सारेसारे तृप्तीत ! तेवतो मनगाभारा.।। शब्दगंधले तव […]

अशी कवीता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ लाघवी कवीता हळूच पाऊली येते मयुरपिसी मखमली मृदुल करांनी अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ।।१।। कदंबतरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते शब्दफुलांच्या या वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते ।।२।। कालिंदीच्या! डोहातूनी त्या सुरेल, ताल सप्तसुरांची येते राधे! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते ।।३।। शब्दशब्द मनी भाव उमलता वास्तव! […]

क्षणभंगुर जीवन

कधी उमजणार तुला मनुजा क्षणक्षण सरतो जीव आपुला जीव हा क्षणभंगुर, अशाश्वत क्षणाचाही नाही इथे भरवसां ||१|| तरी मुक्तनिर्बंधी जगतो आपण भौतिक सुखात, बेधुंद अविरत परिणामाचीही, न करता चिंता अविचारी, हा विनाशी भरवसां ||२|| जे जे पेरावे, ते ते इथेच उगवते जे जसे करावे तसेच इथे भरावे हीच तर असते, नियतीची रीती समजुनिया मनुजा वाग जरासा […]

साक्ष भगवंती

सुरम्य सप्तरंगलेले जीवन फुले, पाने, काटेही संगती शब्दभावनां! वैखरीवरती कृपाच! आगळी भगवंती सुखदुःख,वेदनांचे मोहोळ भावनांतुनी गुंतलेली प्रीती सत्य! हेची मर्म जीवनाचे हृद्य वास्तव, सदैव सांगाती मनाचा कोंडमारा जीवघेणा घुसमट मौनी, छळे एकांती भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां तरीही सोबती सांत्वनी प्रीती प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू कालचक्राचा अदृश्य चालक ललाटीचे अलिखित भाकीत साक्ष! हीच कृपाळु भगवंती — वि.ग.सातपुते. (भावकवी) […]

रांजण सुखाचे

सुखसमृद्धीचे रांजण भोगण्यासही पायबंदी क्षण विकलांग पांगळे शब्दभावनां जायबंदी संसारी, सारी तृप्तता धागे सारे ऋणानुबंधी परी फुकाचा विसंवाद सुसंवाद तो भोगवादी विवेकबुद्धी इथे जगावे भाळीचे प्रारब्ध भोगावे विनासक्त डुंबावे जीवनी सुखाच्या, तुडुंब रांजणी स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल शब्दसुखदा मात्र दुर्मिळ अर्थ न उमजे जीवनाचा व्यर्थ! सौख्याचा रांजण — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. ९.  ९ – १ – […]

1 65 66 67 68 69 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..