भोग प्रारब्धाचे
सारेच भरभरून आहे हवे तेच लाभले नाही जीव हा व्याकुळलेला जीवास स्वास्थ्य नाही।।१।। श्रद्धेत विश्वास नाही दगडातही, देव नाही वेड्याच साऱ्या आशा जीवनास अर्थ नाही।।२।। अस्तित्व! सारेच शून्य असे जगणेच विमनस्क कितीदा ? कसे सावरावे हवे तेच लाभले नाही।।३।। हव्यास हा जगण्याचा आज सारा व्यर्थ आहे निष्ठुर भोगणे प्रारब्धाचे त्याविण मुक्तता नाही।।४।। मनेच आज दुभंगलेली वोखट्याच […]