दुर्लभ जीव मानवी
अंगवळणी पडल्या दुःखवेदनां सभोती निर्विकार सुख संवेदना सारेच आपुले सख्ये सखेसोयरे परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां…. भास शुष्कतेचे, संपली मृदुलता गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा हाच शाप कां? जन्म भोगतानां…. अंमल हाच कलियुगाचाच सारा वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना…. रचना क्र. ९९ ८/८/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908