नवीन लेखन...

नुरली नाती जगती

नुरली ,जगती कुठलीच नाती आता प्रेम जिव्हाळा वात्सल्य संपले आता सारासाराच आता भासतो दिखावा सुंदरताही , रमली कृत्रिमतेत आता खरी सुखदा , खरे सौन्दर्य संभ्रमात कलियुगी, मृगजळाचीच ओढ आता माणुस ! माणसाचेच निर्दयी खेळणे निर्माल्य ! कोवळ्या फुलांचेही आता कुठल्या रूढी आणि कुठल्या परंपरा निर्बंधीच साऱ्यांचेच इथे जगणे आता स्वार्थी ! बेछूट प्रीतभावनांची दुनिया नको कुणीच […]

मोक्षमुक्ती

भाळी ! असावे दान जीवाला विवेकी ! संस्कारी सहवासाचे जन्मदात्यांच्या , मंगल उदरी प्राशावे अमृतघट सात्विकतेचे जन्माजन्मातुनी जन्म मानवी वैभवी सुखदा , दान संचिताचे सत्कर्माची नित्य कांस धरावी नीतिमूल्य ! जपावे मानवतेचे हवेत कशाला ते दुष्ट हेवेदावे रुजुदे , ऋणानुबंध वात्सल्याचे जगणे केवळ बुडबुडा क्षणाचा मिथ्याच जीवन ! सत्य युगाचे लाभावी , गुरुकृपाच आगळी शापित ! […]

हिशेब

सुखदुःखाचा , मी कधीच गणिती हिशेब नाही केला जीवा जगविता , जगविता कधी अट्टाहास नाही केला वेदनांतूनही शोधीता सुखा दुश्वास कुणाचा नाही केला सुखसमाधान, योग भाळीचे त्याचा हव्यासही नाही केला निर्मळी ! सहवासात लाभले संस्कारांचे रांजण सोबतीला आघातातही डगमगलो नाही विवेके , सावरले मनांतराला खेळ सारेच त्या अनामीकाचे ना कधी विसरलो दयाघनाला — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

किनारा

चमचमणाऱ्या लाटा भिजवी वाळूचा शुभ्र किनारा वाहतो त्या वरून अलगद धुंद ओला समुद्रवारा ऊन सोनेरी अलगद टिपती माड तरु झुलता झुलता अनाम आनंदी गाणे गाती समुद्रपक्षी उडता उडता निरवतेच्या अशा किनारी बांबूची उबदार बने त्यातून वाहे वारा घेऊन सागराची अथांग स्वप्ने… —आनंद

तिचे आणि त्या दोघांचे प्रेम

तिचे आणि त्या दोघांचे प्रेम म्हणे आंधळे होते कुणी हा आंधळा शब्द शोधून काढला हेच कळत नाही….. आंधळ प्रेम आणि प्रेमात आंधळे होणे यात फरक कोणता शोधणाऱ्यानो शोधा बाबा इतका वेळ नाही आमच्याकडे आम्ही करतो तुम्ही शोधा तुमच्यात दडलेल्या प्रेमाचा एकदा शोध घेऊन बघा म्हणजे आयुष्य फुकट गेल्याचे दुःख तरी होणार नाही हा हा हा आणि […]

निर्मोही गंगामाई

ही पुण्यदा गंगामाई हिचाच अगम्य डोह डुंबता मनी प्रसन्नता तिचाच मजला मोह सुखदुःखा गिळूनिया अविरत तिचा प्रवाह नाही कुणाचाच द्वेष तिचाच मजला मोह ती विरक्तीचा सागर तिच्यात शमतो दाह ती भगिरथाची गंगा ठायी तिच्या निर्मोह जीवनांतीगंगोदक दृष्टांत मुक्तीचा सोहं! (सोहं — ब्रह्मानंद!) — वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र.१५०. १३ – १२ – २०२१.

ती आणि तो आजही तसेच आहेत

ती आणि तो आजही तसेच आहेत जणू काही आत्ताच त्यांचा जन्म झाला आहे…. प्रेमाचा जन्म कधी होतो ते कधीच कुणी सांगू शकत नाही… त्याच्या बाबतीतही असेच आहे हवे ते मिळाले तर प्रेम पूर्ण होते का का आणखी काही हवे असते…… सगळीच कोडी प्रेमाच्या बाबतीत असतात पण सोडवत बसावयाचे नसते… काही सुटतात.. तर काही सुटत नाहीत जी […]

निमिष एकची मजसी पुरे

अजुनही, तुझाच चेहरा माझिया, बंद लोचनात प्रतिबिंब तुझे सोज्ज्वळ निर्मळ माझ्या काळजात सत्यसाक्षी तूच अनामिक हृदयस्थ! तूच तूं एक प्रीत जिथे पहावे, तिथे तूच तूं भास, तुझाच गे ब्रह्मांडात मी इथे, तर तू त्या सलीली प्रीतगंगा, दुथडी प्रवाहात मी डुंबतो सचैल प्रीतडोही निरंतर, तुझ्याच आठवात निमिष! एकची मजसी पुरे तव दर्शनाचे, या जीवनात — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 […]

दिवाळी आठवणीतली!

नवरात्र संपून दसरा उजाडायचा , आणि वेध लागायचे दिवाळीचे. मधला काळ पंधरा दिवसांचा , पटकन संपून जावा वाटायचे. चिवडा , लाडू , चकली ,शेव सारेच तेव्हा घरी बनायचे. विकतच्या घरगुती फराळाचे पेव , तेव्हा बाकी होते फुटायचे. अप्रूप होतं नवीन कपड्यांचं , नवीन शर्ट आणि नवीन पॅंटचं . आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं , तुमच्यासाठी काय घेतलं […]

मी म्हणजे कोण

मी म्हणजे कोण तिलाही तसेच वाटत होते आणि त्यालाही सुरवातीला चागले होते पण कुठे काय झाले हे समजलेच नाही मी पणाच्या विचारात दोघेही दोघे झाले मग मात्र मजबुरी म्हणून राहू लागले प्रेम सुंदर असते प्रेम म्हणजे प्रेम असते हे शब्द टोचू लागले कर्तव्य , व्यवहार करू लागले …संसार करू लागले अतृप्तपणे… — सतीश चाफेकर.

1 68 69 70 71 72 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..