नवीन लेखन...

व्यथेच्या कथा

घराघरातील व्यथा सांगते तुमची नि माझी कथा., व्यथा लहान असो वा कितीही मोठी. एकमेकांना देऊ या सांत्वनाची आधार काठी सगळ्यांचीच अर्जुनासारखी झाली आहे मनस्थिती कुणाचीही चालेनाशी झाली आहे कोणतीही मती. देऊ या मायेचे आपुलकीचे पंखातील बळ. तेव्हा नक्कीच. निराशेचे विचार काढतील पळ एक विनंती करते सर्वांना हात जोडून. चेहर्‍यावरचा खोटा मुखवटा द्या दूर फेकून खरं बोलून […]

एखाद्या वेळी ती दिसते

एखाद्या वेळी ती दिसते बरे वाटते…दिवस सार्थकी लागला असे वाटते.. तिला तसे वाटत असेल का.. हा विचार कधी कधी येतो.. आणि माझे मलाच हसू येते आपण इतके ‘ अपेक्षित ‘ कसे असू शकतो…. उपेक्षित पेक्षा अपेक्षित बरे निदान मनातल्यामनात positive होता आले पाहिजे हा विचार प्रत्येकाचा असतो अर्थात कबूल करणार नाही कोणी… कारण दिवसभर त्याला किवा […]

खंत अंतरीची

घडेल मनीचे,असेच वाटले होते ते तर कधीच, काही घडले नाही सरला, जरी भयाण काळोख तरी, सभोवार उजाडलेच नाही उरी,कृतार्थतेची आंस निर्मळी परी, कृपावंत गवसलाच नाही झाल्या घायाळ साऱ्या भावनां अर्थ जीवनाचा कळलाच नाही भासले होते सारेच सारे आपुले व्यर्थ सारे, ही खंत सरली नाही सत्य! कलियुगाचे हेची शाश्वत मानवताच, जगती रुजली नाही राम कृष्णही इथेची होवूनी […]

उदे ग अंबे उदे

तूच आदिशक्ती तूच आदिमाया , सदैव ठाकतेस उभी, अमंगल नष्टाया. आगमने तुझ्या सारे, मंगल होऊदे, उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे , नवरात्रीचा जागर, होई तुझा आई, अस्तित्वे तुझिया, कळीकाळ पळून जाई. संकट महामारीचे, समूळ अता जाऊदे, उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे , वात्सल्य आईचे, नेत्री तुझ्या दिसतसे, वास्तव्ये […]

ती कशी असेल

ती कशी असेल किवा तो कसा असेल त्याचा किवा तिचा वेळ आरशासमोर जाऊ लागतो घरचे टिंगल करू लागतात पण त्यांना हे कळत नाही त्यांनी पण त्या वेळी हेच केले असणार अर्थात पदरी काही न पडल्यामुळे ही टिंगल सुरु होते हिरवा रंग हिरवा दिसू लागतो तेव्हा तो किवा ती असेच करणार तेव्हा टिंगल करताना आपले करपलेले भूतकाळ […]

प्रीतभाव

शब्दसागर! दान सरस्वतीचे उमलते निष्पाप हृदयांतरात आभाळ! सारे प्रीतभावनांचे विरघळे, अलवार भावप्रीतीत मनगर्भी! काहूर, संवेदनांचे मी शोधतो, सुगंधा स्पंदनात माळीता, हृद्य क्षणाक्षणांना मंत्रमुग्ध! प्रीतभाव अंतरात तव स्मरणी, भावस्पर्श रेशमी गात्रागात्रातुनी, ओसंडते प्रीत गगनी मी भुलावे अन तू लपावे खेळ, आगळा चालला अविरत तो मोगरा, गुलाब, बकुळ, चाफा दरवळतो धुंद अजुनही अंतरात भावप्रीतिच्याच, महाकाय लाटा गुंफितो मी […]

नववधू सखे

अंग हळदीत न्हाले म्हणून हुरळू नकोस गं आता हळदीचा रंग रोज अनंत छटांत गं अक्षता त्या रंगीत येता वाट्यास गं आता तसे शुभ्र कण निवडून तू रांध गं तुझ्यातले जे भले बुरे दिसेल अगदी उठून गं आधी लपेटी सारे मायेच्या मखमली पदरी गं बोल लावील कोणी तेव्हा कोसळून उन्मळू नको गं समजून उमजण्या वेळ लागे तेव्हा […]

शिक्षणाचं वाटोळं, online झालंय

शिक्षणाचं वाटोळं, online झालंय. गेटचाच उडालाय रंग आणि – गंजून कराकरा वाजायला लागलय , सताड उघडून पडणच संपलय, कारण शिक्षणाचं वाटोळं – online झालंय. वॉचमनकाकांच्या दंडुक्याला, न उरलय काम, पोरं नाही मस्ती नाही, न नोकरीत राम. दटावणं रागावणं संपूनच गेलंय , कारण शिक्षणाचं वाटोळं – online झालंय. जिन्याला-मैदानाला पोरांची आस, अंगाखांद्यावर खेळवणं हाच त्यांचा ध्यास. एकटेपणाचं […]

सायलीने लावली लीली

नातजावयाने शेतात प्रायोजित तत्त्वावर लावलेल्या लिलीच्या यशानंतर आता मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचे ठरविले आणि नातीच्या हाताने लागवड सुरू केली त्या निमित्ताने गम्मत म्हणून सुचलेली कविता.. सायलीच्या हस्ते वृक्षारोपण असे झाले तर.. सायलीने लावली लीली, धन्य झाली काळी माऊली… सायलीने लावला एक वड, तर संसार होणार नाही जड…. सायलीने लावली जर संत्री, कदाचित राघवा तू होशील मंत्री… […]

ती आणि तो कालच परत

ती आणि तो कालच परत भेटले…..खुप गप्पा मारल्या ते दोघेही अजून तसेच होते.. पूर्वीसारखे…. मनात विचार आला खरेच दोघे lucky आहेत मग परत विचार आला luck…bad luck हे मानले तर असते नाहीतर काहीच नाही…. त्या दोघांना मी अनेक ठिकाणी शोधतो अनेकांमध्ये शोधतो पण सहजपणे सापडत नाहीत…. पूर्वीसारखे असणे महत्वाचे त्याला जुनेपण चिकटलेले नसावे हे चिकटलेले जुनेपण […]

1 69 70 71 72 73 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..