नवीन लेखन...

आधी त्याचे जग

आधी त्याचे जग आणि तिचे जग एकच होते, नंतर मात्र संसारात हे जग कधी विभागले हे दोघांनाही कळले नाही थोडा दुरावा झाला परंतु चांगलेच झाले एकमेकांचे ‘ प्रेम ‘ मार्गी लागले खऱ्या प्रेमांत असेच असते…आधी ते अव्यक्त असते.. मग ते व्यक्त होते आणि मग परत अव्यक्ततेकडे प्रवास सुरु होतो काही समजले का लेको…. — सतीश चाफेकर.

होते पहाट आल्हाद गारवा

होते पहाट आल्हाद गारवा झेडीतो हलकेच शिरशिरी मारवा, प्राजक्त उमलतो हलकेच असा अंगणी बहरुन गंधित सडा.. उगवतो रवी केशरी प्रभा रंग बावरे किरमिजी आभा, उगवत्या रवीस उषेची साथ जरा दवबिंदूची दाटी पानोपानी थेंब सजता.. किलबिल पक्षी थवा आकाशी जसा माळ एका लयीत फिरफिरती पाखरे पुन्हा, सजले आकाश सजली नटून धरा थबकले मन परतुनी वळणावर पुन्हा या.. […]

कधी कधी दूरवरून चांगले दिसते

कधी कधी दूरवरून चांगले दिसते असे म्हणतात …पण प्रेमात मात्र कधीकधी तसे नसते, दूरचे जेव्हा जवळ येते तेव्हा खूपच चागले भासते.. आत्ता भासणे आणि असणे यातील फरक ज्याचा त्यानेच शोधायचा असतो…. पण शक्यतो शोध घेण्याच्या फंदात पडू नये कारण… हा शोध पुढे अपघात ठरू शकतो… — सतीश चाफेकर.

तुला जमलं नाही सहज

तुला जमलं नाही सहज नाजूक भावनांना फुलवणे जमलं फक्त तुला सहज रागाने अवचित मला बोलणे.. मिठीतल्या गोड भावना तुला कळल्या नाही रागाच्या बोलण्यावर तुला दुसरं काही दिसलं नाही.. तुला सोडवता आला नाही मधुर नाजूक मनाचा गुंता मला मात्र मिळाला अलगद वेदनेचा काटेरी ओला कोपरा.. हवे तेव्हा मी समीप हवे तेव्हा लांब तुला सगळं सहज सार हे […]

तुझ्या मिठीत सख्या

तुझ्या मिठीत सख्या मी बेधुंद जराशी व्हावी स्पंदने हलकेच अधरी अंतरात उलघाल व्हावी घेशील मज तू कवेत जेव्हा चांदण सडा अंगणी बरसला लाजेल मी अलगद गाली तेव्हा तू ही सख्या हलकेच मोहरला स्पर्शीले तन आल्हाद तू बहरल्या रोमांचित खुणा ओठ ओठांनी टिपले तू साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा अलवार मिठीत तुझ्या वेढून घे अलगद तू मजला स्पर्श […]

गीत गा

अंधार पडला आहे उजेडाचे गाणे गा वेदना असह्य आहे सुखाचे गीत गा रडणे आता भाग आहे हसण्याचे गाणे गा समोर नागफणा आहे स्तब्धतेचे गीत गा अपघात अटळ आहे सावरण्या गाणे गा मरणा जवळ आहे जीवनाचे गीत गा युद्धाचा ढग आहे शांतीचे गाणे गा निस्तेज मन आहे प्रसन्नतेचे गीत गा गाण्यांना संगीत आहे मानवता रीत जगा निसर्ग […]

गाज सागराची धुंद वाऱ्याची

गाज सागराची धुंद वाऱ्याची प्रणय गीत मंद सूर झंकारले तप्त देह भाव गोड मोहकसे व्याकुळ लोचने अलगद मिटले.. ये प्रिये अलगद अशी जवळी आस मनात लाज गाली विलसे स्पर्शात चांदणे बहरुन साजिरे लाज सोडून देहभान विसर प्रिये.. रोमरोमातून उमटल्या भाव प्रीती समर्पित तू अलगद होशील प्रिये अलवार ओठ चुंबीता मी तुझे फुलतील क्षण मिठीत हळवे बावरे.. […]

नक्कीच कुणाततरी हरवावं!

नक्कीच कुणाततरी हरवावं! नक्कीच कुणी तरी आवडून जावं! नक्कीच कुणाच्या आठवणीत रहावं! नक्कीच कुणाच्या मनात मिटून जावं! नक्कीच कुणाच्या हृदयात राहावं! नक्कीच कुणाच्या प्रेमात पडावं… आयुष्य क्षणभंगुर आहे…आज आहे पण उद्याच कुणी बघितलं आहे!! राग यावा तसा लोभ असावा…. माया, ममता, जिव्हाळा जीवनात अंतरी ठेवावा…प्रेम तर सुखद, सुंदर भावना नक्कीच तिच्या, त्याच्या प्रेमात पडावं…तिच्या बोलण्यात, लाजण्यात, […]

लेकरू

वीटभट्टी फेकं धूर भकाभका तिथ खेळती पोरं चिर्रघोडी धक्का इळभर वाहती किरजले खंगार आयुष्य बाळांचे फेकलेले भंगार मजूर फोडती दगडांच्या बाली लेकरांची त्यांच्या मुकी देहबोली ऊसतोडी माय झोका बांध शेवरी कारखानी चिमणी पाचरट सावरी रेल्वेच्या पटरी झोपड्यांची रांग शिक्षणाचा कोंबडा कधी देईल बांग? — विठ्ठल जाधव. संपर्क: ९४२१४४२९९५ शिरूरकासार(बीड)

कुठला ऋतू हा पर्ण निष्पर्ण पाचोळा आहे

कुठला ऋतू हा पर्ण निष्पर्ण पाचोळा आहे तुझ्या बहरातला मोहर एकाकी जळत आहे सांज ही एकाकी अनोळखी गूढ आहे तुझ्या मार्गातली वाट ही कातर आहे कितीक वाट पहावी निःशब्द मी आहे ओढ तुझी अलगद मन वेढून आहे कुठले बंध हे मज बांधून अबोध आहे कुठले ऋणानुबंध तुझ्यात माझे जोडले आहे का तुझा मोह मज मोहवून मुग्ध […]

1 75 76 77 78 79 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..