नवीन लेखन...

लेकरू

वीटभट्टी फेकं धूर भकाभका तिथ खेळती पोरं चिर्रघोडी धक्का इळभर वाहती किरजले खंगार आयुष्य बाळांचे फेकलेले भंगार मजूर फोडती दगडांच्या बाली लेकरांची त्यांच्या मुकी देहबोली ऊसतोडी माय झोका बांध शेवरी कारखानी चिमणी पाचरट सावरी रेल्वेच्या पटरी झोपड्यांची रांग शिक्षणाचा कोंबडा कधी देईल बांग? — विठ्ठल जाधव. संपर्क: ९४२१४४२९९५ शिरूरकासार(बीड)

कुठला ऋतू हा पर्ण निष्पर्ण पाचोळा आहे

कुठला ऋतू हा पर्ण निष्पर्ण पाचोळा आहे तुझ्या बहरातला मोहर एकाकी जळत आहे सांज ही एकाकी अनोळखी गूढ आहे तुझ्या मार्गातली वाट ही कातर आहे कितीक वाट पहावी निःशब्द मी आहे ओढ तुझी अलगद मन वेढून आहे कुठले बंध हे मज बांधून अबोध आहे कुठले ऋणानुबंध तुझ्यात माझे जोडले आहे का तुझा मोह मज मोहवून मुग्ध […]

सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा

सळसळली पाने ऋतू हिरवा बावरा फुलांत उमलला गंध मोहक साजीरा नटली वसुंधरा शेला हिरवा ल्याला उमलल्या कळ्या धुंदीत चैतन्य सळसळला आनंदाचे गाणे पक्षी उंच आकाशी विहारता बगळ्यांची माळ फुले एका ओळीत बद्धता पानोपानी बहरला निसर्ग भवताल सारा खुणावे मन अलगद हे पाहून नजर फुलोरा उधळून मोती सौंदर्य मोहक खुलवी नजारा देवाने निर्मिली ही सुंदर मनोहर निसर्ग […]

बाप वाटा

या वाट वाटणीसाठी घालती बापाचे वाटे असे कोणते ठेवले पुरून धनाचे साठे? राख भरती डोक्यात कुणी फुकती कानात भाऊ भावाचा वैरी रे असं औषध क्षणात जमिन तुकड्यापायी माणूस विसरे धर्म एका आईची लेकरं कसे करती कुकर्म जागा बांधाच्या वांध्यान देश, माणूस तोडला मळा पडीक पाडला जीवा जुगार मांडला बघ साडेतीन फुट जागा तुला रे जाळाया लोकं […]

देहाच्या बाहेर मन आसक्त होते

देहाच्या बाहेर मन आसक्त होते गात्रे शांत शिथिल डोळे विरक्त होते मोहाच्या सावरीत तुझ्यात फुलून गेले श्वासात बंद लय अंतरी सरगम उमलून गेले ओठ तुझ्या ओठांसाठी आरक्त व्हावे तुझ्या स्पर्शासाठी भाव मुग्ध व्हावे मिठीत तुझ्या अलवार चांदणे मोहून जावे तुझ्या बाहुत अलवर विरघळून जावे न सोसवते रात्र बेरात्र तुझ्यात मन गुंतावे तुझ्या भेटीत कितीक भाव अबोध […]

बंद घरात बंद भिंतीत

बंद घरात बंद भिंतीत कितीतरी घुसमट आहे निःशब्द डाव भातुकलीचे ती अबोल कितीतरी आहे.. चूल आणि मुलं यात ती गुरफटून अबोध आहे कर्तव्य तिचेच तिला मग बंदिस्त घरात व्यापून आहे.. न प्रेम न जीव न काहीच दोघांत सूर सारे बेसूर आहे हवे ती शरीरासाठी रात्री बायकोचे लेबल समाजमान्य आहे.. मन नाही भाव नाही संसार हा डाव […]

एक्झिट

कधीतरी एक्झिट घायचीच ना, घेऊयात कि आरामात आलंय कोण इथे थांबायला, जाऊयात कि आरामात एक्सिट घ्यावी अशी कि कोणालाच कळणार नाही थांबवायचे म्हटले तरी शोधूनही सापडणार नाही उगाच त्रास नको कोणा, नकोत वाया टिपे गाळाया इथे प्रत्येकालाच कोण व्याप, सगळेच म्हणतात उचला चला उरकूयात कोणताही असो प्रसंग काट्यावरच सरकूयात आज मी गेलो… उद्या तू येणारेस रडतोस […]

सरपंच

पंचामध्ये मोठा पंच गावगाडा सरपंच सरकारचा दूत जसा प्रश्नपत्रिकेचा संच! घडो काहीबी गावात बोला म्हणे सरपंच लोकांचे धरी धनुष्य आपला तुटतो प्रपंच! बोलणे खातो तसाच टवाळी विषय होतो दिसली कडक टोपी म्हणती माल हाणतो! आरोपीच्या पिंजऱ्यात रोजच खडा असतो मतदानाच्या बुथवर विरोधी राडा असतो! आली जर का योजना भोवती गराडा असे निघली त्यांची बिले आभाळी बघत […]

आरक्त देही मधुमास लुटला

आरक्त देही मधुमास लुटला तुझ्या मिठीत वसंत फुलला मिटल्या पापण्यात आठवणी तरळल्या उमलत्या कळ्यांचा गंध बहरला तुझ्या ओढीत भाव धुंद उमटला मोह मिठीचा गंधार अंतरी चेतला घेता तू अलवार चुंबन स्पर्श गंधाळला ओठ ओठांना अलगद भिडता चेतना तप्तल्या ओठ हलकेच चुंबीता रोमांच तनुभर मोहरला तुझ्यात बंध आल्हाद मखमली वेढून गेला — स्वाती ठोंबरे.

बाबा

नेहमीच तिन्हीसांजेला वाट पाहीली आमचे बाबा घरी कधी येतील? मायेचा पंख पसरून कुशीत कधी घेतील परिराणीची गाणी कि गोष्ट आज सांगतील? नेहमी सांगे आई, कामात गुंतले असतील निज बाळा आता, आत्ता इतक्यात येतील वाट पाहून पाहून डोळे जाती थकून दिवा जाई विझून नि रात्र जाई सरून बाबा येण्याची रात्र कधी उगवलीच नाही गोड गोष्टींच सुख कधी […]

1 76 77 78 79 80 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..