नवीन लेखन...

तुझ्या अलगद स्पर्शाने

तुझ्या अलगद स्पर्शाने मी आल्हाद मोहरुन जावी, दव भिजली पहाट सख्या तुझ्यात गुलाबी व्हावी.. रोमांचित फुलेलं सर्वांग नजर फिरता तुझी, हात तू हातात माझा घेता ती बकुळ फुले लाजती.. मिठीत तू हलकेच घेता उमलतील कमलदल पाकळ्या, ओठ ओठांना भिडतील विरह संपेल हा असा.. एकरुप होते तुझ्यात मी मिठीत अलवार घे मजला, हसतोस मंद जरासा तू तुझ्यात […]

ओंजळीतली फुले

कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले, सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन, उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून कधीतरी ये चिंब ओली बनून माती, जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी कधीतरी दे तुझ्या मनातले थोडे जग, व्यापून उरेन इतका, कधी देऊन तर बघ… — वर्षा कदम.

आई नावाची कविता

हात खंगले भंगले या रानाच्या मातीत स्वप्न उद्याचे पाहिले थोर गर्भार रातीत तुडी चिखल अनोनी भेगा भिजुनी पायात पीकं वाढवी उरात ओढ संसारी राबत आता माखला संसार दही हातानं गाडगे उभा जलम घातला झाडी संसार वाडगे तुझ्या चविष्ट हाताची भूल रूतून राहिली आई नावाची कविता मूक होऊन गायली वाट लेकरांच्या वाटे डोळे लाऊन पाहते दिसे रानात […]

आयुष्याच्या वाटेवर काटे अनेक येतात

आयुष्याच्या वाटेवर काटे अनेक येतात, कठीण प्रसंग येता मग स्वामी मार्ग दाखवितात.. येते हमखास प्रचिती कळत नाही काही तेव्हा, लीला असते स्वामींची ही आशीर्वाद असतो तो तेव्हा.. होतील चुका अनेक जीवनात पुन्हा पुन्हा, स्वामी घेतील पदरात दुःख दूर करतील तेव्हा.. नको राग नको लालसा स्वामींची होता कृपा, मन होईल प्रेमळ,निर्मळ आपोआप आपुले तेव्हा.. काय असेल ती […]

कृष्णसखी

थांब थांब मोहना, आर्त वेणू वाजवू नकोस तुझ्याचसाठी वेडी ही , अजून तिला भारू नकोस थांब जरा मोहना, असा मल्हार छेडू नकोस होऊन जाईल चिंब धरणी, का उसंतही देऊ नकोस? थांब जरा मोहना असा तू नाचू नकोस मनीच्या या झंकारल्या तारा, अजून त्या तोडू नकोस थांब आता मोहना असा तू बहरू नकोस भरल्या या तरुवर आता […]

ताई

आज ती येऊन गेली पोटातली माया ठेऊन गेली इतक्या दिवसांच पोरकेपण क्षणात सार मिटवून गेली आज ती येऊन गेली भाच्याला पापा देऊन गेली खेळणी आणि पैसे थोडे खाऊसाठी देऊन गेली आज ती येऊन गेली सासर माहेरचं बोलून गेली तिच्या माझ्यातलीच काहीं गुपिते मनामनामध्ये साठवून गेली. आज ती येऊन गेली हळदीकुंकू घेऊन गेली तोंडभरून आशीर्वाद अन घर […]

शोधू पुस्तकात भिमाला

शोधू पुस्तकात भिमाला घेऊ मस्तकात भिमाला ||धृ|| निसर्ग न्यायाने वागला पाणी पाजताना गर्जला असा महामानव जाहला तळपत्या सूर्याने पाहिला ||१|| देह लेखनीत झिजला अश्रू पापणीत टिपला संविधानी कायदा केला पाईक समतेचा झाला ||२|| हुंकार वेदनेचा साहिला न्याय बहुजनां दिधला माय दुबळ्यांची झाला नेता जगी असा पहिला ||३|| शिकण्याचा मार्ग चांगला संघटन गुण शिकविला संघर्ष अंगार पेटविला […]

चहा

लवंग, आले दालचिनीचा सुगंध सारा भरून घ्यावा डोळे मिटूनि निवांत रेलून घोट चहाचा हळूच घ्यावा वेळ असो दुपार तीनाची की पहाटेचा असो गारवा चहास का लागे निमित्त कोणते? कधीही द्यावा कधीही घ्यावा चाहते असे चहाचे मिळता योग दुर्मिळ जुळून यावा स्थळकाळाचे बंधन सोडून मस्त गप्पांचा फड रंगावा मात्र एकट्या सांजवेळी घोट चहाचा हळूच घ्यावा पापणीतल्या सुखस्वप्नांना […]

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले

मनाच्या तळ्यात कितीक सल भिजले दाटले उमाळे भाव निःशब्द गहिरे साचले अश्रू खोल गहिऱ्या जाणिवांचे डोळ्यांत अश्रुंचे ओंथबले पाट कित्येक ओले काहूर मन कितीक कढ अंतरी मिटवले वणवा पेटतो वनी पानांचे हिरवेपण जळते मेलेल्या भावनेत नवं संजीवनी न येते पसरुनी वणव्यात दाह करपून होरपळे न फुलतो वसंत बहरात कधी कुठे न पाने फुले मोहरुन न पुन्हा […]

भोग

तुला जाणवल कसं माज जगणं, सोसणं वाट पाहून राह्यले कधी सरल ह्ये जिणं घाम गाळू तरी किती किती जुंपू गं कामाला दिस सरूनही जातो थार नाही गं जीवाला तुज्या अंगणी सडा गं जाई जुई चमेलीचा कशी गुंफू केसात गं गुंता घामाचा, बटांचा सण येती आणि जाती बाया जिवाने नटती बघू बघू तुटती गं काया उनात रापती […]

1 77 78 79 80 81 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..