नवीन लेखन...

वृक्षसंमेलन

कारखान्या विष, सोडले हवेत गादी पैसे खात, सुजलेली वाहनी गराडा, या भूतलावरी लोट धुरांवरी, स्वार असे प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन पृथ्वी जे आसन, डळमळे रसायनी शेती, विषच पेरले बियाणे रूजले, संकरीत बोडखे डोंगर, देखवेना डोळा कोणा कळवळा, येईल का? पाणी जो मागतो, नित्य देवाकडे लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे तडातडा तोडी, बांधावरी झाड जरा नाही चाड, वृक्षाप्रती […]

वाटा वेड्या वाकड्या

वाटा वेड्या वाकड्या हरवून साऱ्या गेल्या ओल दव भिजल्या वनी प्राजक्त फुलांत हरवल्या.. गंध मंद आल्हाद दरवळे पावलोपावली बहर खुणा देह भिजल्या हळव्या मनी पर्ण ऋतूंचा मोहर नवा.. मन अलवार धुंद मोहरे पर्ण पाचूचा हिरवा नजारा ओल हळव्या एकांत क्षणी रक्तीमा गाली विलसे लाजेचा.. वसंताचे आगमन होता ऋतुराज बेधुंद बहर मना वसंताचे हलकेच साज लेणे सजली […]

पाऊस येतो

आला तोच सुगंध ज्याचा आठ मास विसर पडतो, आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर जीव वेडावून भान हरपतो, आला तोच सोहळा ज्याचा सृष्टीला परमानंद होतो, भिजवून धरतीला आकंठ चराचरातून निर्मळ करतो, आला पाऊस तोच पुन्हा जो दरसाली नित्यनेमाने येतो, तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा पूर पुन्हा वाहून आणतो, आला शहारा तोच तेव्हाचा डोळे अलगद मिटून घेतो, तू […]

या मनाचे त्या मनाला

या मनाचे त्या मनाला शब्द सारे भाव उलगडते काव्यांत जीव व्याकुळ कवितेचे लेणे कवीला लाभाते.. या हृदयाचे त्या हृदयाला शब्द सारे बंदिस्त होते बहरतो कवी कवितेत आल्हाद कवीचे मन वेगळे जरा असते.. या अंतरीचे त्या अंतराला शब्दसाज कवितेत गुंफून राहते मरेल कवी या दुनियेतून जरी कवीच्या कवितेचे नक्षत्र अमर होते.. — स्वाती ठोंबरे.

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी संपते जीवाची ही वात गात्र कुरकुरू लागली मन भरून सारखं तुला पाहू वाटतं थरथरे माझे हात घेण्या तुझा हात हाती एक जीव एक प्राण तुझ्या माझ्या संसाराची जन्मभर साथ दिली आता सोडून चालले एकला समजू नको तुला पाहतील हे डोळे तो येईलचं आता काळाच्या कुशीत न्यायला जरा विसावते आता मग जमेल जरा जायला जाईन […]

सहज तू म्हणालास विसरुन तू सार जा

सहज तू म्हणालास विसरुन तू सार जा, बहर होता तो एक मनातून मिटून सगळं टाक.. सहज सार विसर म्हणलं तरी विसरता येत नाही, मनाच्या तारा छेडल्या तू आता आठवणी मिटत नाही.. बहर तर सगळ्यांचा असतो पान,फुलं,अगदी निसर्गही बहरतो, स्त्री मनावर फुंकर मारता मात्र कहर तो जरा मन कल्लोळ होतो.. सहज सोप्प तुला वाटतं तरी स्त्री असते […]

मेघमल्हार

पावसाच्या थेंबांचा एक वेगळाच रव असतो, एक ताल, एक नाद असतो एक अवीट गाण्याचा बोल असतो कि ऐकणाऱ्या कानांचा खेळ असतो पावसाच्या येण्याचा काहीं नेम नसतो कधी येईल कधी जाईल, त्याचा तो मुक्त असतो भरून आलेल्या आभाळाला न पेलणारा भार असतो तप्त झालेल्या मनाला दिलासा देण्यागत गार भासतो पाऊस येण्याचा स्वतःचा एक बाज असतो कोसळत धोधो […]

एकदा तुझी अन माझी भेट व्हावी

एकदा तुझी अन माझी भेट व्हावी हात हातात तू घेता कातरवेळ तुझ्यात फुलावी.. एकदा तुझी अन माझी भेट व्हावी तुझ्या मोहक मिठीत मी अलवार मोहरुन जावी.. एकदा तुझी अन माझी भेट व्हावी व्याकुळ वेळ क्षणांची आस तुझ्यात मिटावी.. एकदा तुझी अन माझी भेट व्हावी प्रतीक्षा तुझी आतुर मनी तुझ्या मिठीत मी लाजवी.. एकदा तुझी अन माझी […]

जळणं

ज्याचं त्याने ठरवावं आपलं आपण कसं जळाव धडधडत्या चीतेतली उद्धवस्त करणारा अग्नी व्हावं कि क्रांतीतल्या पेटत्या मशालीची ज्योत व्हावं कि व्हावं स्वार त्या वनव्यावर जे सगळं जंगल जाळून जात ज्याचं त्याने ठरवावं आपलं आपण कसं जळाव उब देणारी शेकोटीतली तापलेली आग व्हावं कि तप्त पोटातल्या अग्नीला विझवणारी चुलीतली राख व्हावं कि स्वतः सहित जळणाऱ्या समईतली प्रकाशीत […]

वात

गळे अवसान सारे फुटे कणसाला तुरे चुलीत घाला तुमचे वांझ दौऱ्यावर दौरे! कापसाच्या होई वाती विम्याचं रिकामे पोते निवडून दिलेले घोडं कंपन्याची पेंड खाते ! खतात लूट,बियांत लूट आडत्याचीही दलाली खरेदीखताला बघा महागाई लावी लाली ! कोपतो प्रत्येक ऋतू तशी काळी अवकाळी पीठ मीठ भाकरीचं शिक्षण धरी काजळी! बनिया येती घरा तेव्हा बटनी मतदान करा निवडून […]

1 78 79 80 81 82 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..