नवीन लेखन...

श्री गजानन जय गजानन

असावे मन एकाग्र चित्ती सगुण साकार कैवल्य मुर्ती, कितीक गावी तुमचीच महती महाराजांची अखंड नीनदे कीर्ती… विदर्भात असेल ग्राम नगरी पुण्य पावन ही शेगाव पंढरी, यावे ईथे लिन होऊन नेहमी महाराजांच्या पुण्य पावन चरणी… अनेक लीला अगम्य शक्ती दिगंबर सदा ध्यान करुणाकरी, मंत्र मुखी शांत भाव सदा मुखी गण गण गणात बोते कल्याणकारी… कितीक भक्त कितीक […]

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला कवितेचा जन्म कवी कल्पनेत साकारला तमा न कसली न फिकीर कशाची कवीच्या अंतरी नसते कमी शब्दांची कवी मन असते वेगळे हळवे हृदयी म्हणुनच सुचतात काव्यमाला कवी मनातुनी वेदनांचे अंगार भावनांचा कोरडा बाजार पाहता मोहरतात जाणिवा कवीच्या अलगद मनात तेव्हा कुठलेही काव्य करतो कवी अंतरातुनी शब्दांची मात्रा चालते कवीच्या श्वासातुनी पेटतो दाह उडतात […]

त्या काजळ रात्री

त्या काजळ रात्री पाऊस बरसत होता, घन व्याकुळ मी अशी श्वास तो कोंडत होता.. आरक्त डोळ्यांत अश्रूंचा बांध आल्हाद साचला होता, पापणी आड अश्रूंचा थेंब मिटून हलकेच डोळ्यांत होता.. कळले होते मला अंतिम श्वास माझे त्या वळणावरी, जाणार हा देह सोडून लांब दूर जग हे सोडुनी.. परी मन तयार न होते त्या अंतिम कातर क्षणी, देव […]

मन हिंदोळा

आली भाऊबीज आली गं… दिवाळी सरत आली गं माहेरा जायची घाई गं कशी मी आवरू बाई गं उंबऱ्यात येरझारा गं भाऊ येई बोलावाया गं नवीच मी इथे आले गं सोडून कसं तिथ राहू गं हुरहूर जिवा लागे गं ओढ मायेची ओढे गं माझ्याविना ही तुळशी गं पोरकी होऊन सुकेल गं तिथून इथे आले गं इथली सावली […]

फेसबुक दुनिया

आभासी जग ही मोहमयी फेसबुक दुनिया आहे चांगली वाढवण्या छंद आवडीचा परी लोकं तीच आहे सर्वत्र सारखे आहे चांगले आणि वाईटही इथेही आहे टवाळक्या भरगच्च आहे नावं ठेवणे चालू आहे दुसऱ्याच्या वॉलवर टेहाळणी आहे फ्रेंड रिक्वेस्ट त्यासाठी आहे कोण पोस्ट करतो त्यात चुका काढणारे परकेच आहे एकावरुन दुसऱ्याला बोलणारे इथे अनेक आहे तुला म्हणून सांगतो, सांगणारे […]

हुंदका

उठ गं बये रडतेस काय रोजचाच मार हा सहतेस काय कुणीच नाही येणार अश्रू पुसायला तूझेच तूला टिपायचेत, मग थांबव कि स्वतःला उठ गं बये तुझंच राज्य तुझ्याच घरात तुलाच सारे त्याज्य बसूदे चटके, उठूदे वळ दिवसाअखेर संपते गात्रातले बळ उंबरठ्याच्या आत राहील हे सारं संस्कारांना माती देऊन, नाही बाहेर कुणी बोलणारं ओढायचाय गाडा, एकटीच्याचं चाकावर […]

मोहरणाऱ्या मनात मी

मोहरणाऱ्या मनात मी लाजून अलवार आहे सांडले अत्तर गंधित मी मोहक दरवळून आहे.. लाजला मोगरा अलगद अंतरी गंध मिटून आहे चांदण्याचा गजरा माळीला मी चंद्र हसून मज पाहत आहे.. स्वप्नांतल्या कळ्यांची कविता मी आल्हाद गुंफून आहे सागराची गुज हलकेच मी स्वातीचे मोती हृदयस्थ अबोल आहे.. — स्वाती ठोंबरे.

सल

तुझ्या अंगणात जाईजुईचे गं सडे मन दुखे का गं सखे का गं झाले पाहून वेडे कळ उठे अंतरीही दावू कशी उघडून तुझ्या अंगणाचा हेवा कशी सांगू उलगडून सारे वाटे मज हवे, पर कसे ते मिळावे काटेरी च्या बना आम्ही सदोदित जगावे सुंगधाही पारखी मी, वाटेत काटेच काटे वेल लावू कुठे गं हा, ज्यात परिमळ दाटे वाटे, […]

विसरायचं म्हणलं तरी

विसरायचं म्हणलं तरी मन अधिक भरकटत किती आवरा मनाला नको तिथं गुंतून जातं… ओल्या आठवणी साऱ्या कातरवेळी मनात तरळतात डोळ्यांतील अलगद थेंब मग पापणी आड जमा होतात… आठवणींचं गाठोडं कस अलगद हलकं करायचं ? रित्या मनाला खोलवर कस सावरुन घ्यायचं… नको होतात मग रात्री तुझी आठवण ती येता हळवे होते मन त्या वेळी रात्र सुनी अबोल […]

काळजाचं दुकनं

माज्या कुकवाचा धनी, माज्या डोरल्याचा मनी कवातरि ऐक माज्या काळजातली गानी भिताडानाबी कळतंय रोजचं माज दुकनं तूला का कळू न्हाय, माज झिजून झिजून ह्ये जिणं संगटीने ऱ्हातुयस येकाच खोपीमंदी संगटीने पितुयस येकाच खापरातलं पानी तरी बी ऱ्हातुया कोरडंच वाळवंटावानी दावू कसं रं तूला, माज्या पिरितीतली ज्वानी खोपट्यातल्या गर्दीत हुडकू सांग कसं माज्या काळजातलं इप्सित सांगू तुला […]

1 80 81 82 83 84 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..