काळजाचं दुकनं
माज्या कुकवाचा धनी, माज्या डोरल्याचा मनी कवातरि ऐक माज्या काळजातली गानी भिताडानाबी कळतंय रोजचं माज दुकनं तूला का कळू न्हाय, माज झिजून झिजून ह्ये जिणं संगटीने ऱ्हातुयस येकाच खोपीमंदी संगटीने पितुयस येकाच खापरातलं पानी तरी बी ऱ्हातुया कोरडंच वाळवंटावानी दावू कसं रं तूला, माज्या पिरितीतली ज्वानी खोपट्यातल्या गर्दीत हुडकू सांग कसं माज्या काळजातलं इप्सित सांगू तुला […]