नवीन लेखन...

गरिबाघरचा पाऊस

पावसात नेहमीच शोधू नका प्रेमाची हवा कधी वळून माज्या गळक्या छताकडेही पहा टपटप गळतंय आभाळ लावू कुठं कुठं ढिगळं, घर वाहतंय हो माझं जरा पहा यावेळी डांबर, सिमेंट कि ताडपत्री कसं नि काय परवडलं कि घेऊन जाईल समदं ही वादळी हवा भांड्यानी भरलं घर, ओघळ वाहती जागोजागी कशापायी येतो पाऊस सालाची बेगमी होई माती दरसाली असं […]

बोलणं

बोलणं म्हणजे काय तर मनातील भावना व्यक्त करणं!अगदी साधं, सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं कसही असावं,पण बोलणं असावं. शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात. की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं…. प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत काहींना काही चालू असत. वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे […]

फुलता पारिजात

सांगू कशी वाऱ्याला थांबव तुझे आघात गारवा फार सुखावे झोम्बे नुसता झंझावात सांगू कशी रजनीला उतरू नकोस चांदण्यात सारे शीतल वाटे मन फुलता पारिजात सांगू कशी धरतीला न्हाऊ नकोस पावसात मृदगंध अत्तर कोठे सापडेल या जगतात सांगू कशी मनाला झुलू नकोस आनंदात सारे घडे मनाजोगे संपेलच विरहाची रात्र!! — वर्षा कदम.

प्रीत

अशा झुंजूमुंजू समयी सखया याद तुझी यावी केशरी लाली नभाची गाली माझ्या चढावी कलकलाट कोकिळेचा तीव्र असा होत जाई आठवे ती हुरहूर सारी मन कातर कातर होई ओढ अशी कशी ही बाई जग सारे विसरून जाई कधी पुन्हा भेट अपुली जी होता होत नाही ये एकदा तू परतुनी मनी चिंब ओलावा लेउनी शुष्क कोरडी ही माती […]

एक नातं

एका धाग्याची रे वीण एका नात्यात रे जिणं गाठ बांधून पदरी आले आता तुझ्या घरी एका खोप्याचं जगणं तुझं माझं काही देणं जीव जीवाला जागलं सारं मायेनं झाकलं एका दु:ख काही घाव दुजा सारखाच भाव आता नाही रं वेगळं सारं मीपण गळं नातं नवं, नवी दिठी पर अशी कायम राहो विटी कुणी हटलं, म्हटलं तरी राहो […]

आठवण

आज सख्या रे मी खरेच तळमळले आठवणीने तुझिया आतून हळहळले एक लकेर ‘त्या’गाण्याची अन क्षणात प्रीतीचे अपुले ऋतू मज स्मरले तो किनारा एक सळसळता अन वाळूत दोघांचे होते ठसे उमटलेले मूक एक शेवटची भेट अन हातात हात अखेरचे घट्ट गुंफलेले पापण्यांच्या कडा ओलेत्या अन चिंब धारा त्यात आपण भिजलेले किती रे ऋतुमागून ऋतू हे सरले आहे […]

नवी खोपी

आज नव्या घरात येऊन 10 दिवस झाले. अजूनही घर ओळखीचं असं झालं नाही… सामान जुनंच आहे… तरीही नवीन ठिकाणी हात सरसावत नाही. जुने शेजारी, जुन्या वाण्याचा अजूनही कुठे कुठे भास होतो… भाजीवाल्यापासून गिरणीपर्यंत सगळेच चेहरे अनोळखी आहेत.. ते मला नि मी त्यांना कोण ही नवी बया? हा एकच सवाल आहे… भिंतीसुद्धा बोलक्या असतात… त्या आधीच्या घरी […]

काय मिळालं मला काय मिळालं तुला

काय मिळालं मला काय मिळालं तुला सल राहिली मनात आठवण राहिली हृदयात.. काय मिळालं मला काय मिळालं तुला अबोल झाल्या जाणिवा निःशब्द उरल्या भावना.. काय मिळालं मला काय मिळालं तुला वेदना मिळाल्या मला दुःख उरले अंतःकरणात.. — स्वाती ठोंबरे.

ती गेली तेव्हा

ती गेली सोडून आम्हां कसे सोबती जाऊ सांगा रहावं लागे टिपून आसू मागे सारे सावरायला किती काय नि किती काय गोळा तिने केले असते करू काय या सर्वांचे कुठे जाऊ सांगा पुसायला? तुझा लेक शोधतो आई कुठे आत्या, काकू कि मावशीत तू दिसे? कुणातच नसे तुझी छवी कसे समजावू,सांभाळू अजाण लेकराला? सुगरणीविना चूल मुकी दिसे तांब्या […]

स्वप्न क्षणांचा पक्षी

हे चांदणे नभीचे अन् पौर्णिमा शरदातली वाहणारी ही हवा अन् दिवाळी स्वप्नातली.. गुणगुणतो पहाटवारा दवबिंदू शीतल शीतल स्तब्ध धूसर डोंगरमाथे ऐकती शांतता निश्चल.. फांदी फांदी वरून उडतो क्षणा क्षणांचा स्वप्नपक्षी अन् हृदय प्रदेशी रेखीत जातो जाणिवांची अपूर्व नक्षी… —आनंद

1 84 85 86 87 88 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..