नवीन लेखन...

खरी प्रकाशित दिवाळी

अंधार गुडूप झाला तर घाबरे कशाला विजेच्या शलाकेला कशास दिवा उजेडाला कायम असत्य दावणीला बांधे कुकर्म जो गाठीला त्यास असे भीती तमाची दचके अपुल्याचं सावलीला प्रतिबिंब पाहता अपुले जो कचरे स्व नजरेला नतमस्तक होतानाही हुरहूर छळे काळजाला नको नको ते भाव उदास दाटे कातर समयाला चोरी आहे मनाची आणिक भितो तो कुणा चोराला या दिव्यात उजळून […]

स्मृतीलहरींच्या हिंदोळी

स्मृतीलहरींच्या हिंडोळ्यावरी तनमन झुलते , हरिच्या गोकुळी।।धृ।। ब्रह्म ! मुरलीधरी हरि सावळा मधुरम , मंजुळ घुमवी बासुरी प्रसन्न ! गोकुळी राधाच बावरी छुमछुम , छुमछुम छंद गोकुळी।।१।। नादब्रह्म ! चराचरी हरेगोविंद हरे , हरेराम , रामकृष्णगोविंद हरिकृपाच ! तोषवीते आगळी देवकीनंदन यशोदेच्या गोकुळी।।२।। प्राजक्त ! डुले सत्यभामा द्वारी सडा फुलांचा रुक्मिणी अंगणी प्रीतीच निर्मळ , देवत्व […]

जगलो कसा किती?

जगी मी जगलो कसा कळले नाही पण भोगले ते कधी विसरलो नाही आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो तो सहवास लाघवी विसरलोच नाही भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान दोष! कधीही कुणाला दिलाच नाही लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला हताश होऊनी […]

सांत्वनी दुःखहारी

दुःखवेदनाच ! सखी खरी । आठवांतुनी झुळझुळणारी । मुक्त हृदयांतरी बिलगणारी । सत्य ! स्वसांत्वनी दुःखहारी ।।१।। दुःखाचे पावित्र्य ! आगळे । ते कां? सहचजी, उमगते । सुखदु:खाचे दान भाळीचे । भोग भोगणेच ! जन्मांतरी ।।२।। अनाहत लाठी भगवंताची । ऋणानुबंधीच साऱ्या गाठी । तोच जोडितो,तोच तोडितो । जपुया ! सत्कर्माची शिदोरी ।।३।। जन्मा ! येताजाता […]

तुझे शब्द

मुळ हिंदी कविता- कवि – अनूप भार्गव, अमेरिका; अनुवादक- विजय नगरकर […]

जन्म मानवाचा

जीवन, जगण्यासाठी जीव, आतुरलेला आहे जन्म! हा मानवाचा विवेकी जगायचाआहे ऋतूऋतूंचे आविष्कार निसर्गाचे वरदान आहे नाती सारी ऋणानुबंधी भावप्रिती! साक्ष आहे अंतरी लळा जिव्हाळा प्रारब्धाचे वरदान आहे शिरी आभाळ नक्षत्रांचे मनस्वी सुखशांती आहे निर्मोही स्पर्श भावनांचे स्वर्गसुखाची नांदी आहे जगता जगता जगवावे मानवी नितीमुल्य आहे येताजाता रिक्त ओंजळी अंतिम नग्न सत्य आहे सदा भजावे अनामिका तो […]

आशा

ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर वारंवार हेच करीत असतो कुठे टाका, कुठे बटण तो शिवतच राहतो, परीक्षक हातातील उत्तरपत्रिका हिसकावून घेई पर्यंत काही खरे,कुठे चुकीचे काही न काही तरी परीक्षार्थी लिहीतच राहतो, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत चूक-अचूक निशाणा तो सैनिक साधित शेवट पर्यंत लढत राहतो, कोणीही शस्त्र खाली खाली ठेवत नाही कोणीही आशा सोडीत नाही अंतिम […]

प्रेम

प्रेम हे करत नसतात , ते होत असते प्रेम हे मागत नसतात, ते मिळत असते प्रेम हे दिसत नसते, ते जाणून घ्यावे लागते प्रेम हे बंधन नसते, ते मुक्त करते प्रेम परिसासारखे असते जे लोखंडाचे सोने करते प्रेम अमृतासारखे असते जे मेलेल्याला जिवंत करते प्रेम हे तिचे किंवा त्याचे नसते, ते दोघांचे असते — विवेक विजय […]

कोजागर

हा चंद्रमा शारदीय पौर्णिमेचा शीतल चंदेरी प्रीतचांदण्यांचा साक्ष कोजागरती कोजागरती स्वर्गीयस्पर्श अश्विनी पौर्णिमेचा ।।१।। गवाक्षातूनी खुणावतो चंद्रमा मनआभाळी चांदणे नक्षत्रांचे धुंद बेधुंद, दरवळते रातराणी प्रीतगंधाळ तो अवीट सुगंधाचा ।।२।। तनमनी रमती गतस्मृतींचे रावे निरवतेत अबोली रात्र धुंदवेडी बरसते, शुभ्र चंदेरी कोजागिरी जागर! पुनरुपी प्रीतभावनांचा ।।३।। दुग्धपान!अमृती मनोमिलनाचे सौख्यानंदी पुण्यपावन सोहळा ज्येष्ठत्वाचे हृद्य स्मरण संस्कारी आदर्श हाच […]

कन्फ्यूज्ड !

पुण्यामधलंच स्थळ हवं । मुंबईला सेकंड ऑप्शन । लिकर पी कर विकएन्ड । लाईफसाठी हीच कॅप्शन ।। शनवारवाडा , वैशाली हे । आऊटडेटेड झाले पॉईंट्स । गोल ऍचिव्ह करण्यासाठी । शोधते मी नव्या हाईट्स ।। मल्टिप्लेक्स , मॉल मध्ये । टाईमपास भारी होतो । सिंहगड पर्वतीवर । आता कोण जातो येतो ? फेबु ट्विटर मेसेंजरवर । […]

1 86 87 88 89 90 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..