प्रवास
उतरते ऊन पुन्हा परसातल्या दारातुनी उजळले दीप पुन्हा शिशिराच्या सांजेतुनी हवेहवेसे होते कधी समुद्रवाऱ्याचे शहारे मागून का मिळते कधी पहाटेचे स्वप्न गहिरे? शोधताना चांदणे वेचले उन्हाचे कवडसे राहिले मग दूर मागे दिव्यांचे बिलोरी आरसे… —आनंद
उतरते ऊन पुन्हा परसातल्या दारातुनी उजळले दीप पुन्हा शिशिराच्या सांजेतुनी हवेहवेसे होते कधी समुद्रवाऱ्याचे शहारे मागून का मिळते कधी पहाटेचे स्वप्न गहिरे? शोधताना चांदणे वेचले उन्हाचे कवडसे राहिले मग दूर मागे दिव्यांचे बिलोरी आरसे… —आनंद
आता जगणे अंगवळणी पडले जगी मी डोळे झाकुनी चालतो टाळुनीयाच वेडीवाकडी वळणे सन्मार्गावरी, सावरूनी चालतो शब्दाशब्दांचे अर्थ सहज जाणतो जर दिला शब्द कुणा तो पाळतो ऋतुऋतूंचा, जरी असे बेभरोसा कालचक्र भाळीचे, निमूट झेलतो जरी उध्वस्त स्वप्ने सारी अंतरीची गुच्छ आशांचे मी हळुवार गुंफीतो हृदयांतरी सुगंधाच्याच अत्तरकुपी माझ्याच भावगीतातुनी मी हुंगतो लोचनी सांजळलेली तिन्हीसांजा त्या सोज्वळ निरांजनी […]
बेधुंद दरवळता गं गंधबकुळी अजूनी होतो सारा भास तुझा मनहृदयी अलवार बिलगणारा अविस्मरणीय, तो स्पर्श तुझा किती? काय? कसे स्मरावे धागे आठवांचे किती उसवावे मर्मबंधीच साऱ्या रेशीमगाठी उलगडता, सहजी भास तुझा भावगंधले ते स्पर्श मयूरपीसी अव्यक्त! सारे झरते शब्दांतूनी उमलताच लाघवी प्रितकळ्या लोचनी घट्टमिठीचा भास तुझा ब्राह्ममुहूर्तीची ही मधुरम स्वप्ने गोकुळी राधामीरा कृष्णसखा मंतरलेल्या साऱ्या कातरवेळी […]
जगी काय मिळविले काय हरविले अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो हव्यासापोटी किती, काय हरविले सत्यभास हा जीवा अविरत छळतो सारीपाट ! उलगडता जन्मभराचा अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे तरी गतकाळ नित्य आठवीत असतो अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी जीव ! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला प्रारब्धभोग जन्मभरी […]
ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी आपुल्याच मनाची समजूत घालावी चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी या […]
भाळीचे सुखदुःख,ओंजळीत ओसंडले तरीही, आज स्वच्छंदी जगावेसे वाटते थकली गात्रे, निमाल्याही आशाकांक्षा तरीही सुखानंदे, मस्त जगावेसे वाटते सरता दिनराती, अंतरी आंस उद्याची उगवता, पुन्हा नि:शंक जगावेसे वाटते ऋतुचक्रांचे, अविरत अस्तित्व चराचरी विनाआसक्त, कृतार्थी जगावेसे वाटते हे माझे ते माझे, सोडुनीया स्वार्थ सारे जगती, मुक्त, निर्मोही जगावेसे वाटते न कुणी कुणाचे, भास सर्वत्र मृगजळी हाच सत्यार्थ ! […]
पूर्वी कसे नवरात्रीला नऊ दिवस आपण नऊ रंगाचे कपडे परिधान करायचो… तू नाचायचीस मनसोक्त आणि मी तुझं ते नाचणं डोळेभरून पाहत राहायचो… रंगाच फार काही नाही पण तू जवळ असल्यावर मी नेहमीच आनंदात भरभरून जगायचो… तुझा आनंद मी माझ्या हृदयात साठवून तो साऱ्या जगाला हसत आनंदाने वाटायचो… आता फक्त राहतो उभा तुझी वाट पाहत तसाच त्या […]
कधीतरी… बाळगले होते स्वप्न उराशी कधीतरी मी ही यशाचे… वाटलेही होते घ्यावे चुंबन कधीतरी त्या ही नभाचे… जपले होते हृदयात प्रेम कधीतरी मी ही मनीचे… रेखाटले होते चित्र सुंदर कधीतरी मी ही आयुष्याचे… घडवले होते एक शिल्प कधीतरी मी ही स्वतःचे… निर्मिले होते एक साम्राज्य कधीतरी मी ही शब्दांचे… विणले होते एक जाळे कधीतरी मी ही […]
हल्ली का कोणास जाणे सभोवताली पडत असतो पाऊस बातम्यांचा फक्त आत्महत्येच्या… त्या बातम्यांचा तर होत नाही ना परिणाम रिकाम्या मेंदूवर त्रासलेल्या माणसांच्या… समस्या, दुःख, विरह आणि वेदना कधी नव्हत्या त्या तर सोबतीच होत्या युगानुयुगे मानवाच्या… नात्यातील गुंता भ्रम असतो आणि प्रेम असते माया आयुष्यात काहीच नसते वजनाचे आपल्या जिवाच्या… © कवी – निलेश बामणे ( ND.) […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions