किनारा
चल सखये,जरा विसावू नदी किनारी बघ आठवांचा खोल डोह या किनारी गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।। वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी ओढ निरंतर, सारितेला मिलनाची चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।। मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी चल न्याहळू त्या निरव शांत […]