संतसखा
रंगला अभंगी, संतसखा पांडुरंग वाळवंटी वैकुंठीचा राणा पांडुरंग ।।धृ।। आले ज्ञानोबा, आले हो तुकोबा घेऊनी दिंडीसंगे सकल संतजना नाचतो आसमंती , विठ्ठल पांडुरंग ।।१।। बोलती टाळ मृदंग अन दिंड्यापताका वैष्णवांच्या पाऊली, नाचे विठू सावळा मुक्तीच्या सागरी, ब्रह्मरूप पांडुरंग ।।२।। उरले न आता इथे कुठे, द्वैत, अद्वैत एका जनार्दनी, जाहले सारे एकरूप श्वास नि:श्वासाचा धनी, एक पांडुरंग […]