नवीन लेखन...

खंत मनी ! मी काय प्रार्थू ?

समजावू कसे या मनाला जे शोधिते अजूनही तुला.. आजही लोचनी रूप तूझे.. तुझाच ध्यास या जीवाला.. एकमेकांवरी नि:सिम प्रीती तुझी न माझी, जडली होती पाहता , पाहताच एकमेकां प्रीतीभाव आगळा रुजला.. नि:शब्दुली ! भाषा मनांची अंतरंगी सारीच प्रीतभारली कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी जगवित होती तनमनांतराला.. जरी निर्व्याज ही सत्यप्रीती प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी तुजविण सारे निरर्थ […]

सत्य असत्य संभ्रमात

जन्म हा सुखाचा की दुःखाचा.. कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे.. जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे कुणाची कुणाला आज ओढ आहे.. बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध खरे कोण कुणासाठी जगतो आहे.. ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी सांगा , आज मनःशांती कुठे आहे.. ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे.. बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात […]

अशी कविता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ.. लाघवी कवीता हळूच पाऊली येते.. मयुरपिसी मखमली मृदुल करांनी.. अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।।१।। कदंब तरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते… शब्दफुलांच्या , वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते…।।२।। कालिंदीच्या ! डोहातूनी त्या लय , ताल सप्तसुरांची येते… राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।।३।। शब्दशब्द मनी भाव […]

अनाकलनीय हुरहूर

कधी खेळकर तर कधी चिंतातुर.. कधी आनंदी तर कधी उदासीन.. अनाकलनीय हुरहूर ही विलक्षण.. तरीही , उमलते हळुहळु जीवन..।।१।। कालचक्र सृष्टीचे , अखंड अविरत.. तांडव , पंचमहाभूतांचे ऋतूऋतून.. स्पंदनांतुनी , सुखदुःखांचे ओघळ.. ऋणानुबंधी ! सारे संचिती जीवन..।।२।। प्रीतभावनां ! अंकुर मानवतेचा.. प्रीतीविना कां दुजे असते जीवन.. ब्रह्मानंदी ! केवळ स्पर्श प्रीतीचा.. कृपावंती मोक्षदा , कृतार्थ जीवन..।।३।। […]

‘तो’ आणि ‘ती’

ती चुल्ह्याजवळ, तर त्याच्या डोईवर सूर्य तिच्या हाताला चटके, त्याच्या पायांना ! ती श्वासांसाठी हवेची झुळूक, तो विचारांसाठी शाई दोघे बनतात मुलांचे गुरुत्वाकर्षण, ताठ कण्याचे ! तिची पावले घट्ट मातीत, तो आकाशपावलांचा ती असते वसुंधरा दिन, तो असतो पुस्तक दिन ! ती सतत जवळ- हात फैलावला की स्पर्शणारी तो आभाळासारखा, सदैव दुरुन निरखणारा ! ज्याची जशी […]

चाललो पंढरीला पायी

चाललो पंढरीला पायी पाहतो विठ्ठलरखुमाई ।।धृ।। वेचूनी संतांच्या सद्गुणी गुंफितो मी भावफुलांची वेंणी ।।१।। रांगलो , खेळलो , धावलो या तुझ्या विश्वाच्या अंगणी ।।२।। नुमजे मजला गाथा ज्ञानेश्वरी मी अज्ञानी ऐकतो संतांची वैखरी ।।३।। लावूनी टिळा गंध कपाळी दंगलो दिंडी, किर्तनी टाळ मृदंगी ।।४।। गायली मी , जीवनाची भैरवी आता लागली ब्रह्मानंदी टाळी ।।५।। लोचनी विठाई […]

सागरमाया

नितळ लोचनी नीरव शांत चराचर.. ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज.. एकांती उसळते आर्त भावनांचे गुज.. बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।। माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा.. प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी.. प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर.. ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।। महाकाय , अथांग महासागर हृदयी.. भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी.. निरवतेत , घोंगावती […]

मायमाऊली मराठी

माऊली मराठीच माझी मायबोली.. ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली.. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या.. स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली..।।..१ ज्ञानेश्वरी , ही ज्ञानेश्वर माऊलीची.. अभंगगाथा तुकयाची भक्तीरंगली.. भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा.. माऊली मराठीच माझी मायबोली..।।..२ शब्द मराठीच अस्मिता अंतरीची.. गीता,भागवत,दासबोधादी ग्रंथाली.. अक्षर , अक्षर , साक्षात्कार कृपाळू.. माऊली मराठीच माझी मायबोली..।।..३ माझ्या मराठीचा मला स्वाभिमान.. जगतवंद्य ! ती जगतवंद्य शोभली.. […]

सांग मना काय राहिले

वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली.. तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले.. तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला.. वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१ सांग मना , आज तुज जवळ काय नाही.. तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा.. वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला.. अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२ आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी.. आत्माही […]

अहंकार

लाभले असता सर्व काही.. त्याची कधी मोजदाद केली नाही.. जे थोडेसे काही मिळाले नाही.. त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१ मन मोकळे कधी ठेवले नाही.. फक्त स्वानंदात रमलो.. मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ.. हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२ काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?.. अरे झाडा सारखे जीवन असावे.. जे जे आहे , ते ते सर्व देत […]

1 96 97 98 99 100 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..