प्रार्थना
मनासारखे सारे आयुष्य जगावे.. हे स्वप्न अधुरे , मी नित्य पाहतो.. अंबरी घनमेघनांचे अवीट सोहळे.. लोचनी मी अलगद बांधून ठेवितो.. हृदयांतरी बिलोरी प्रतिबिंब तयांचे.. भावशब्दातुनी मीच गुंफीत जातो.. तूच हृदयस्थ ! विराजमान प्रांजला.. स्वप्नातुनी तुला गं मी नित्य पाहतो.. ओढ तुझी गं , ती अव्यक्त अनावर.. क्षणा क्षणाशी रोज तडजोड करतो.. भाग्यरेषा ! साऱ्याच मम भाळीच्या.. […]