मला वाटतं, की या मुंबईतली गेल्या चार-पाच दशकात अस्तित्वात आलेली बहुतेक प्रत्येक गोष्ट अनौरस आहे. एकेकाळच्या ‘मुंबाई’ला, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ‘मुंबाबाय’ नांवाची वेश्या बनवून तिला शांघायची लाली, कॅलिफोर्नियाची पावडर आणि सिंगापूरची सिंगापुरची टिकली लावून वेश्येच्या रुपात जगाच्या बाजारात उभी करून आणि तिच्याशी शय्यासेबत करायला देश आणि विदेशातून वखवखलेले बोलवायचे, हे गेली अनेक वर्ष सुरू आहे. […]
आपली लोकशाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. […]
भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटला. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला. ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली. […]
नाणार येथील या प्रस्तावित रिफायनरीला ‘ग्रीन’ रिफायनरी असं गोंडस नांव दिलं गेलं होतं. मी ‘ग्रीन रिफायनरी’ची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, ‘ग्रीन रिफायनरी’ हा शब्द प्रयोग वनस्पतींपासून मिळवल्या जाण्याऱ्या तेल उद्योगासाठी करतात, खनिज तेलासाठी नव्हे. मग नाणार इथे होऊ घातलेल्या खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पास ‘ग्रीन रिफायनरी’ असं संबोधण्याचं कारण काय, हे मला समजलं नाही..रिफायनरीच्या संबोधनातच मला मोठा गोंधळ दिसतो आणि हे असं का, याचं स्पष्टीकरण संबंधीतांनी स्थानिक जनतेला देणं गरजेचं आहे. […]
आपल्या राजकारणाची पातळी किती घसरलीय ह्याची ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी उदाहरण आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुसलमान आणि एकूणच सर्व समाजातील लोकांनी आणि विविध नेते/पक्षाच्या आंधळ्या फाॅलोअर्सनी या प्रकरणात भावनांच्या आहारी न जाता, हे नेमकं काय राजकारण शिजत आहे हे समजून घेऊन वागण्याची आज गरज आहे. […]
२०१८ हे वर्ष भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे ठरत आहे. वर्षाच्या प्रारंभीच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येऊन देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘‘ऑलवेल’’ नसल्याची बाब समोर आणल्यानंतर न्यायदेवतेच्या प्रतिष्ठेला पहिला धक्का बसला. या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता देशाच्या इतिहासात प्रथमच भारतीय सरन्यायधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. […]
सतत १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अपयशामुळे आलेली ग्लानी दूर होण्याची चिन्हे नाहीत यास एकमेव कारण म्हणजे काँग्रेस जवळ नेतृत्वाचे दुर्भिक्ष हेच आहे.काँग्रेस अजूनही नेहरू गांधी परिवारा ला पर्याय शोधण्याचे टाळत आहे.हीच खरी पक्षाची शोकांतिका आहे. […]
देश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला हुकुमशहा मिळावा हीच आता देशाची गरज आहे.मग मोदी हुकुमशहा झाले तरी चालतील पण शासनाला अर्थात प्रशासनातील अधिका-यांना आता फक्त हुकुमशाहा च CONTROL करू शकतो.तो हुकुमशहा मात्र प्रामाणिक पाहीजे आपोआप सर्व सुता सारखे सरळ होतील […]
‘मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. […]
निवडणूकांना आता फक्त वर्ष राहीलंय. मतदारांना फितवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तरी डोकं शांत ठेवा. तुमच्या जीवावर पोळी भाजायचा सर्वांचा कावा लक्षात घेऊन, या निवडणूकीत तुमचा पक्ष कोणता असं कुणी विचारलं, तर ‘देश आणि देशहित’ हाच आमचा पक्ष असं ठणकावून सांगायला कचरू नका.. […]