जो शेजेला घेतो, तो शेजवर जे करेल ते निमुटपणे सहन करायचं असतं हे ओघानंच येतं. आपण आपल्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या शेजेवर चढवले गेलो आहोत आणि वेळीच जागे झालो नाही, तर अनैसर्गिक बलात्कार अटळ आहे.. […]
सर्व उंदरांवर मंत्रालयातील उंदीर वरचढ ठरले असून त्यांनी थेट सरकारचा ‘पारदर्शक’ चेहराच कुरतडविल्याचा आरोप सरकारमधीलच एका जेष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे बिळात राहणार ‘उंदीर’ आज थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. […]
सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. […]
परवाच्या पाडव्याच्या सभेला जमलेली प्रचंड गर्दी मनसेसाठी नसून श्री. राज ठाकरेंसाठी होती याविषयी कुणाचं दुमत असू नये. या सभेत पक्षाचा घसरणारा क्रमांक वर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्याना काहीतरी गृहपाठ देणं अपेक्षित होतं, पण तसं घडलं नाही. केवळ मराठी माणूस आणि मराठी भाषा हा, सध्याच्या काळात, राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही. श्री. राज ठाकरेंना आता आपला पाया अधिक व्यापक करण्याची गरज आहे. […]
आज आपण कामगारविषयक जो कायदा वाचत आहोत त्या कायद्याचा प्रणेता लेनिन होता हे सध्या किती कर्मचा-यांना माहित आहे? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे , ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. […]
श्री सुनील देवधर यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड सुद्धा उत्तम होती हे वेळो वेळी सिद्ध झाले आहे.यास काही किरकोळ अपवाद असू शकतात पण अपवादानी नियम सिद्ध होतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे .पण नियमातील अपवादा ची संख्या वाढली तर मात्र गोंधळ होतो. […]
ईशान्य भारतातील लहान राज्यात बांगलादेशी घुसखोरांचे आक्रमण हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा या ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुका त्रिपुरात 18 फेब्रुवारीला, मेघालय व नागालँड या दोन राज्यांत 27 फेब्रुवारीला होतिल. मात्र याला मिडीयात,कुठल्या वाहिन्यांमध्ये खास स्थान मिळाले नाही. या तिन्ही विधानसभांच्या सदस्यांची संख्या प्रत्येकी 60 इतकी आहे. ईशान्येकडच्या राज्यांची एकूण सदस्य संख्या बंगालपेक्षाही […]
भारताने आपले राष्ट्रहित लक्षात घेऊन येणार्या काळात इस्राईलशी चांगले संबंध प्रस्थापित करून देशाचा सामरिक, आर्थिक व तांत्रिक अशा तिन्ही बाजू भक्कम कराव्यात. याकरीता इस्राईल हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो व हे सुधारलेले संबंध भारताच्या विकासात खूप हातभार लावतील. […]
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!! […]
‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून “चला पुन्हा ‘समते’ च्या पेटवू मशाली!” म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत. […]