एका अनपढ ट्रक ड्रायव्हरच्या ट्रकवरच्या या वाक्याला आपल्या देशाचं ब्रिदवाक्य म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही..! जनतेची व देशाची फिकीर तुम्हा-आम्हाला. या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना तर आपल्या भावी पिढ्यांची फिकीर पडलीय.. मग तुमच्या आमच्या कितीही पिढ्या बरबाद झाल्या किंवा ढेकणासारख्या चिरडून मेल्या किंवा वांग्यासारख्या खरपूस भाजून मेल्या तरी चालतील..!! […]
सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..! […]
वाहनांचा कर्कश्य आवाज ,धूर .वाहतूककोंडी यामुळे जनता आधीच त्रस्थ आहे.यात आता दिवसरात्र दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सरकार नक्कीच धनदांडग्यांच्या दबावा खाली काम करते आणि नेत्यांना शहराचा बट्ट्याबोळ झाला तरी त्याची फिकीर नाही हेच असे निर्णय घेण्या मागील कारण असावे.
फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही आणि त्यात हे पुन्हा नवे संकट !!! […]
ठाण्यामध्ये बिगरशेती कर (Non Agriculture tax) ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत वसूल होतो आहे…हाच कर मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरात घेतला जाऊ नये या साठी भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आघाडी सरकारला धारेवर धरत होता. […]
या वर्षीच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या प्रतिष्ठीत दिवाळी अंकात कणकवलीचे विद्यमान आमदार श्री. नितेश राणे यांच्यावर सप्टेंबर २०१७ महिन्याच्या मध्यावर लिहिलेला माझा हा लेख. मी श्री नितेश राणेचा किंवा काॅंग्रेसचा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही. मी राजकारणावर लिहायचंही टाळतो. सिंधुदुर्गातील माझ्या परिचयाच्या आणि तौलनिक विचार करणाऱ्या काही जाणकारांशी चर्चा करुन मी श्री नितेश राणेवरील हा लेख लिहिलेला आहे. […]
आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही. […]
हा प्रकल्प लालफीतशाहीत अडकला किंवा इतर प्राथमिकतांकडे दुर्लक्ष करून केवळ बुलेट ट्रेनचा उदो उदो केला गेला, तर इंडिया शायनिंगसारखी परिस्थिती ओढवू शकेल. गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने आजवर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. २०२२ सालपर्यंत नवीन भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर भारत-जपान मैत्रीची बुलेट ट्रेन एकही लाल सिग्नल न लागता पळवावी लागेल. […]
या दिवाळी अंकात माझा ‘सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्यातील राजकीय नेतृत्व’ या विषयवार लेख प्रसिद्ध झाला आहे. हा विषय मला देण्यात आला होता. सदर दिवाळी अंकात महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय नेतृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या अंकाचे संपादक श्री. राम शेवडीकर असून, प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि साक्षेपी लेखक श्री. प्रवीण बर्दापूरकर या अंकाचे अतिथी […]
गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले. […]