…भिती मनाचा दगड झाल्याची नाही, तर हा दगड समाजाचाच कपाळमोक्ष करील याची आहे. ती प्रक्रीया सुरू होण्यापूर्वीच हा दगड फोडला पाहीजे. दगडाच्या आतही जीवन असू शकतं हे रामदासस्वामींनी शिवरायांना दाखवून दिलं होतं. आता मात्र आपल्यालाच आपले रामदास स्वामी बनवून, स्वत:च्याच मनाचा दगड फोडून आतील जीवनाला वर आणायची कधी नव्हती येवढी गरज आज आहे. […]
…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात… […]
माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. […]
मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात. […]
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. […]
अस म्हणतात कि संकटाच्या काळी जो उभा रहातो तोच खरा मित्र. फायद्यासाठी कोणी मित्र होतात तर काही वेळ बघून जवळ येतात. तर काही पक्के मित्र रहातात. पण काही असे असतात कि जे एका हाकेवर धावून येतात. इस्राइल हा भारताचा असाच एक मित्र देश. बघयला गेल तर भारताच्या दृष्ट्रीने अगदी छोटा पण त्याची महती अशी आहे कि भले भले देश त्याच्यापासून वचकून आहेत. […]
चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे. […]
राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण? […]
“मै दीनदार बुत-शिकन..!” “मै दीनदार कुफ़्र-शिकन..!” (“मी मूर्ती फोडीन, मी काफरांची कत्तल करीन आणि अश्या प्रकारे मी धर्माचं रक्षण करीन, धर्माचं पालन करीन!!”) असं अत्यंत अभिमानानी जो स्वतःबद्दल बोलत होता.., त्याप्रमाणे त्यानी हजारो मूर्ती फोडल्या, अनेक काफरांची कत्तल केली, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले.. आणि त्याच्या परीने त्याची ही प्रतिज्ञा जितकी शक्य झाली तितकी पूर्णही केली..! […]