“आज सर्व सुजाण नागरिकांनी या लोकप्रतिनिधींना आपला देश, किंवा आपले राज्य कसे चालवलं पाहिजे ? कुठल्या तत्वावर चाललं पाहिजे ? याच विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरण आणि ते पूर्ण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा करून ते सत्यात उतरवणं म्हणजे खर जागृत राजकारण होय.” […]
राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. […]
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले. […]
सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत. […]
१९५५ सालातील गोष्ट. काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नेहरूंबरोबर काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर काही सदस्यांची नेमणूक व्हावी यासाठी चर्चा केली. असा विचार होता की, हे सदस्य तरुण असावेत व ते पक्षकार्यासाठी उपयुक्त असावेत. डझनभर नावे विचारार्थ आली होती. त्यात इंदिराचे एक नाव होते. शास्त्रीजी व ढेबर यांनी इंदिरेला विनंती केली, की तिने युवकांचे व महिला विभागाचे नेतृत्व करावे. […]
नुकताच मी “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे “ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या डोक्यात विचारांचे कल्लोळ माजू लागले. दिघे साहेबांचे जे असंख्य चाहते होते त्यात मी सुद्धा होतो. फक्त चाहताच नव्हे तर मी त्यांचा अनेक दशके त्यांचा अनुयायी आणि सहकारी सुद्धा होतो. दिघे साहेब हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भविष्यात या विषयावर कुणीतरी डॉक्टरेट नक्की मिळवेल इतके त्यांचे व्यक्तिमत्व प्रचंड मोठे आणि गूढ होते या बद्दल माझ्या मनात शंका नाही . […]
१९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले. […]
प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात. […]
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी माणसाने सर्वकांही केले. साम, दाम, दंड भोगला. बलिदान दिले, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, कारावास भोगला. तेंव्हा कुठे दिल्लीश्वरांच्या मनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा कांहीसा विचार येऊन गेला. त्यादृष्टीने कांही हालचाली होतात न होतात तोच प्रत्येक वेळी राष्ट्रीय आपत्ती आली नि सीमाप्रश्न मागे पडला. […]
सीमाभागातील मराठी माणूस मात्र महाराष्ट्राकडे नि दिल्लीतील मराठी नेत्यांकडे आशाळभूतपणे पहात राहीला नि अजूनही पहातोच आहे. सीमाप्रश्नाचे गांभिर्य केंद्राला कधी वाटलेच नाही. त्याचा नेमका फायदा कर्नाटकाने उचलला. बेळगावची एक इंच भूमीही कर्नाटकाला देणार नसल्याची दुर्योधनी दर्पोक्ती ते करू लागले. […]