नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि विशेषकरून आयएसआय आणि चीन या राष्ट्रावर नजर ठेवून आहेत. नेपाळमध्ये सध्याचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करीत आहे. ख्रिश्चन व मुस्लिम समाज आपला धर्म व संस्कृतीचा नेपाळमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी व तिथे आयएसआय सक्रिय आहे. […]
भारतातील बांगलादेशी घुसखोर बेकायदा असूनही ते येथे ‘मतदार’ बनले आहेत, या देशाचे अधिकृत नागरिक झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधून काढणे अजिबात कठीण नाही. सरकारने मनापासून ठरविले तर देशात कुठल्याही बिळात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना सहज हुडकून काढू शकते. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयानेच या घुसखोरांसमोर शेपूट घातले आहे. […]
सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शस्त्रास्त्र आयातीत भारत आघाडीवर असून दुसर्या स्थानी चीन आणि तिसर्या स्थानी पाकिस्तान आहे, असे म्हटले आहे. अहवालातील ही आकडेवारी बरोबर आहे. यापूर्वी चीनचा क्रमांक शस्त्रास्त्र आयातीत पहिला होता. परंतु चीनने आपल्या शस्त्रास्त्रासंबंधीच्या धोरणात बदल केला. […]
केंद्र आणि राज्य सरकारने गुप्तचर यंत्रणा अधिक भक्कम करून जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांच्या टोळ्यांचे तळ उद्ध्वस्त करायला हवेत. माओवाद्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी हवी असलेली राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नाही,ती येणे आवश्यक आहे. प्रश्न आहे की नेमके काय करायला पाहिजे? […]
काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे. […]
`लष्करी जवानांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील आहे. माजी सैनिकांसाठी सरकारने `वन रँक, वन पेन्शन’ ही योजना सुरू केली. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नाही. या योजनेची अंमलबजावणी न करता सरकारने जवानांच्या भावनांशी खेळ केला आहे,’ […]
पाकिस्तानव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर झिनजिआंग हा प्रांत ,चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात ४१ टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून ४० टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे. […]
नेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते. […]