दर महिन्याला किमान दोन ते तीनवेळा चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करणे ही नेहमीच बाब झाली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिक अनेकदा लडाखमध्ये भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातच वारंवार घुसखोरी करते आणि त्यावर आपले प्रेमळ सरकार फक्त चर्चा करुन त्यांना परत जाण्यास सांगतात. […]
सध्या १२ लाख कोटी रुपयांचे बनावट चलन भारतीय अर्थव्यवस्थेत घुसले असल्याचा एक अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार लाख बनावट नोटा उघडकीस आल्या. २०००-२००१ मध्ये दहा लाखांत तीन बनावट नोटा, असे प्रमाण होते, ते दहा लाखांत आठ इतके वाढले आहे. […]
जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पाकिस्तानने वारंवार केलेली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये धुडगूस घालायचा आहे, परंतु जोपर्यंत तिथे लष्कर आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पुढे केली. […]
ज्या आम आदमी पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचे हे धोरण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आप’ने आतापर्यंत कधीच आपले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा काश्मीरविषयीचे धोरण जाहीर केलेले नाही. भूषण यांनी दहशतवाद्यांना अनुकूल अशी भूमिका घेणे, हे कुणालाच आवडलेले नाही. शेवटी केजरीवाल यांनी खुलासा केला, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. […]
आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न… सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून […]
इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने सुरतमध्ये अणुबाँब स्फोट घडवण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक कबुली इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळने दिली आहे.२६-३० डिसेंबर २०१३ मध्ये ४०,००० पोलिस आणी सिआरपिएफ़ जवानांनी नक्षलग्रस्त भागात ओपरेशन चालवले. त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही.
नेपाळी काँग्रेस या पक्षाने सर्वाधिक १०२ जागा जिंकल्या. त्याला सत्तास्थापनेसाठी पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याखालोखाल कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) या पक्षाने ९२ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वात मोठी पीछेहाट झाली आहे ती युनिफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट (यूसीपीएन-एम) या पक्षाची. फक्त २५ जागांवर विजय मिळाल्याने बंडखोर माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष आता तिसर्या क्रमांकावर फेकला गेला आहे. […]
काश्मीरवर हक्क दाखवण्याची आंतरिक उर्मी पाकिस्तानला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच पाकिस्तान, काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताबरोबर वारंवार युद्धाची भाषा बोलत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी राजकारण्यांची “बेबाक बकबक’ नुकतीच गाजली आणि आपण असे बोललोच नव्हतो असा खुलासा करण्याची पाळी नवाज शरीफांवर आली. […]
नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलाच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावाही घेतला जातो. यंदाच्या नौदल दिनावर मात्र १३ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘आय.एन.एस. सिंधुरक्षक’ या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे सावट आहे. या अपघातात नौदलाला ही पाणबुडी आणि त्यावरील १८ नौसैनिक गमवावे लागले होते. सध्या भारताच्या नौदलात ‘सिंधु’ वर्गातील (रशियन किलो वर्ग) एकूण दहा पाणबुड्या कार्यरत आहेत. […]
ऐतिहासिक काळापासूनच महाराष्ट्राची किनारपट्टी विशेष सुरक्षित नाही. शस्त्रे, दारूगोळ्याची तस्करी व अतिरेक्यांची घुसखोरी किनारपट्टीवरून सुरू असते आणि हे प्रकार रोखावयाचे कोणी? नौदल, तटरक्षक दल, पोलिस आणि गुप्तचर संघटना एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न असतात.