आता निवडणुकांचा काळ आहे. सध्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू आहे. सात महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे हा निवडणुकांचा काळ चालू झाला आहे, भाजपने आता नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विषय उपस्थित केला आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी बिहारमध्ये पाटण्यात मोदी यांचा हुंकार मेळावा होता. या मेळाव्यात मोदी भाषण देणार होते. […]
दमदाटी करून चीनने आपल्याला बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही करावयास लावली.चीनने भारतीयाना व्हिसा नाकारायचा आणि भारताने मात्र चिनी नागरिकांसाठी पायघड्या घालायच्या हे भारतासाठी लज्जास्पद आहे. चिनी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील बंडखोरांना दिली जात आहेत. […]
चीनमधून येणार्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही कोणताही त्रास देणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच व्हिसा मिळेल. आम्ही यापूर्वीच असे वचन दिले होते आणि ते आम्ही तंतोतंत पाळू. […]
एका आठवड्या पेक्षा जास्त दिवस होऊनही “शटडाउन”चे शटर न उघडल्यामुळे अमेरिकेचे देशातील आणि परकीय देशांबरोबरील बरेचसे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर असताना जगातील सर्वच मिडिया, पत्रकार, आर्थिक आणि राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागून राहिलेला अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय सुरक्षा करारातील बहुतांश मुद्यांवर एकमत झाल्याने आणि करार लौकरच संपन्न होण्याची चिन्हे आहेत असे खुद अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष करझाई यांचे म्हणणे आहे. […]
जम्मू-काश्मीरच्या जम्मू भागातील केरन या गावात गेल्या आठवडाभरापासून घुसखोरी करून ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शेवटी हुसकावून लावण्यात आले आहे. भारतीय लष्कराने विलक्षण संयमाने पार पाडलेली ही लष्करी मोहीम आता संपली आहे. लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी ही घोषणा केली. […]
भारताच्या आंतरिक आणि बाह्य सीमा सुरक्षित नाहीत, अशी कितीही ओरड केली, त्याबाबत कितीही निवेदने दिलीत, निदर्शने केलीत अथवा मोर्चे काढले, तरी सरकार काही त्याची दखल घेण्यास तयार नाही. सीमेवर थातूरमातूर इलाज करून सरकार तेथे शांतता प्रस्थापित करू इच्छिते. […]
देशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ – व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे. […]
आपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे. […]
आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला. […]
जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. […]