ब्रह्मपुत्रा नदीवर भारत-चीन सीमेजवळच ‘ग्रेट बेंड’ येथे चीनकडून बांधल्या जाणार्या मोठय़ा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. फराक्का येथील बॅरेजवरून भारताकडे वळवल्या जाणार्या पाण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरूच आहेत. भारताकडून जास्त प्रमाणात पाणी वळवले जात असल्याचा आरोप बांगलादेशकडून होत आहे. […]
पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता. […]
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच
वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. याला भाषण स्वातंत्र्य म्हणायचे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, याचा अर्थ लोकशाही धोक्यात येईल, असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे. […]
पाकिस्तानातून येणारे सशस्त्र दहशतवादी, बांगलादेशातून मोठय़ा प्रमाणावर होणारी घुसखोरी, नेपाळमधून होणारी ग्राहकोपयोगी वस्तू व बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी, म्यानमार-बांगलादेश, भूतानमधील तळांच्या माध्यमातून उल्फा व इतर दहशतवादी गटांनी भारतामध्ये सुरू ठेवलेल्या कारवाया यामध्ये २०१२ मध्ये मोठी वाढ झाली आहे. […]
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी अतिरेकी मोहम्मद अमीर अजमल कसाब याला आज फासावर लटकण्यात आले. पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात सकाळी ठीक ७.३० वाजता क्रूरकर्मा कसाबचा “हिशेब” करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषीत केले. […]
२४-३०/११/२०१२ पासुन माओवाद्यांच्या “पिपल लिबरेशन गोरिला आर्मिचा रेझिंग सप्ताह” सुरु झाला आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहखात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. स्वामी अग्निवेश यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माओवाद्यांशी वाटाघाटी करायला तयार आहे […]
आपला शेजारी आपला पहिला शत्रू असतो हे चाणक्याचे म्हणणे होते. आपल्याला अश्या अनेक अगणिक कर्तबगार महात्म्यांचा वारसा लाभूनही आपण त्याच चुका करतो. सगळे माहित असूनही आपण बोलतो काय लोकांना सांगतो काय आणि वागतो काय या कडे लक्ष दिले पाहिजे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २०/१०/ २०१२ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष झाले. […]
आपली अमेरिकेशी मैत्री कितीही घनिष्ठ झाली, तरी अलिप्त राष्ट्र चळवळीचे (नाम) महत्त्व त्यामुळे अजिबात कमी होणार नाही. कारण हीच चळवळ भारताला परराष्ट्र व संरक्षण धोरणात निर्णयस्वातंत्र्याची क्षमता प्राप्त करून देईल. जागतिक गट, निरपेक्ष आंदोलन ही संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
आसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत.
आसामातील हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागांत उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जिवाच्या भीतीने पलायन सुरू झाले. अशातच १९ ऑगस्टला बंगळुरूहून गुवाहाटी एक्स्प्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना, अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. या देशाला गृहमंत्री आहे, ही एक अफवाच ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी माघारी परतण्याची धावपळ सुरू केली होती. […]