देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासन सध्या आस्तत्वात असलेल्या संस्थांना सक्षम करण्याचे जाहीर करते, त्यासाठी समित्या नेमते, समित्या अहवाल देतात, पण अंमलबजावणी शून्य. त्याची चर्चा पुन्हा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यावरच होणार. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचेही असेच होणार असेल तर त्याची गरजच काय? यांना आपण का सक्षम करत नाही. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे, वाहतूक तसेच शस्त्र का पुरवले जात नाही? ज्या संस्था आस्तत्वात आहेत त्यांनाच जर आपण सक्षम करू शकत नसू तर त्यात आणखी एका संस्थेची भर घालण्याची आवश्यकताच काय? […]
आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे. […]
मी मायमराठी प्रेमळ व तेजाळ संस्कृति रक्तातच भिनलेला आहे! तेव्हा उत्सवप्रियतेच्या विरूध्द टोकाची भूमिका घेणारा आहे, असा गैरसमज कृपया होऊ देऊ नका. फक्त माझी अट एवढीच आहे की, कंत्राटदारीसारख्या मुख्य व मराठी घरं नासवणार्या इतर अनेक अवदसांना (कॅपिटेशन फी घेणारे शिक्षणसम्राट, भ्रष्ट नोकरशहा व राजकारणी इ.) लाथ मारून बाहेर काढून मराठी घरांमधून ’गोकुळ‘ निर्माण झालं पाहिजे, गणपतीच्या रिध्दी-सिध्दी परप्रांतियांच्या नव्हे, तर प्रथम आमच्या घरात पाणी भरताना दिसल्या पाहिजेत […]
तुम्ही ‘पांढरपेशे‘ आहात की ‘श्रमजिवी‘ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी‘ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्राला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ते२ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय. […]
ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं. […]
जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसील कार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यता पडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते. आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका […]
निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे. […]
माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल. […]
नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. […]