राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था माफियांच्या पायाखाली लोळण घेत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अतिरिक्त ल्हाधिकारी यशवंत सोनवणेंच्या हत्येची घटना अशीच निर्घृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सत्ताधार्यांनी गुन्हेगारांना सल्याचा हा परिणाम आहे. राज्यकर्त्यांनी गुन्हेगारांना मोकाट सोडून भ्रष्टाचाराला चालना देणे न थांबवल्यास राज्यातील कायदेयंत्रणा सातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. […]
समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान! […]
कानकूनची आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषद कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेताच संपली. मात्र, क्योटो कराराची मुदत 2012 पर्यंत आहे. त्या मुदतीत तरी विकसित आणि अविकसनशिल देशांनी आपल्यातील मतभेद कमी करून व्यापक भूमिकेतून क्योटो कराराच्या जागी नवा मसुदा आणला पाहिजे. त्यातही अमेरिका सर्वात जास्त प्रदूषण करत असल्याने तिच्यावर अधिक जबाबदारी आहे. […]
वाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बर्याच दिवसांची शांतता मोडीत निघाली असून हिणकस प्रवृत्तीचे अतिरेकी आजही देशात मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे. […]
विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. […]
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल. […]
एक चव्हाण गेले आणि दुसरे चव्हाण आले. राज्याच्या राजकारणात किंवा समाजकारणात त्यामुळे काय स्थित्यंतर येईल? पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी उफाळून आली असून छगनराव भुजबळ यांचा काटा पक्षातील मराठा लॉबीने काढल्याने अंतर्गत धुसफूस वाढेल का ? ही स्थित्यंतरे काय दर्शवतात? […]
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले. […]
मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे. […]