येणार्या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे. […]
मुंबईवर मागच्या वर्षी हल्ला झाला तेव्हा काही लोकांनी मेणबत्त्या लावुन राजकारण्यांच्या वरचा राग व्यक्त केला होता. आताही निवडणुका आलेल्या आहेत आणि रणधुमाळी सुरु झालेली आहे. काही लोक आतादेखील संताप व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी
तर मतदानच करु नये अशी मते व्यक्त होत आहेत. पण खरे पाहता आपणच याला जबाबदार आहोत. आणि मतदान न करण्याविषयी म्हणाल तर तेच तर राजकारण्यांना हवे आहे. म्हणजे त्यांनी मिंधे केलेले लोक वा त्यांचे कमिटेड कार्यकर्ते हेच फक्त मतदानाला बाहेर पडतील. […]
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती. […]
सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. […]
शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा प्रवास करणारा नेता राज ठाकरे आज आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जी राजकारणात गरुडझेप घेत आहे, ती अनेक राजकीय दिग्गजांना विचारात ठाकणारी आहे. शिवसेना सोडल्यानंतर हा नेता नेमके काय करणार हा अनेकांना प्रश्न पडला होता. […]
हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत. […]