नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

मोदी है तो मुमकिन है !

आता खऱ्या अर्थाने काश्मीरचे भारतात विलनीकरण झाले असून काश्मीर ते कन्याकुमारी असं अखंड भारतीय संघराज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वांकाक्षी निर्णयामुळे काश्मीरमध्ये विकासाची नवी पहाट उगवू शकेल ! तसेच गेल्या सात दशकापासून कुटील राजकारणाचं केवळ एक खेळणं बनून राहिलेला काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचं नंदनवन बनू शकेल. गेली सात दशकं काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती कुणी दाखवू शकलं नाही, मात्र ‘मोदी है तो मुमकिन है !’ या घोषवाक्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी करून दाखवलंय.. […]

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ? […]

ऐतिहासिक निकाल!

वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ३

अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

…. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला ” […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १

इंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते. […]

क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना

सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले. […]

जिंकला तो पैसा !! हरला तो विचार आणि विकास !!!

मराठी भाषा हळूहळू महानगरपालिकेच्या कारभरातून वगळण्यात येईल आणि तिची जागा हिंदी घेईल आणि मग मुंबई सुद्धा अलगद केंद्रशासित केली जाईल आणि तुला मुम्बई बाहेर घालवले जाईल. त्यावेळेस सुद्धा मराठी माणूस झोपलेला असेल जसा तो आता झोपलाय. […]

‘नोटा’ वापरणारे कोण असतात? माझं मत..!

ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात . […]

1 5 6 7 8 9 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..