नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

‘नोटा’ : लोकशाहीच्या बळकटीकरणाकडे एक दमदार पाऊल..!

‘नोटा (None Of The Above)’ हा मतदान यंत्रावरील पर्याय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मतदारांचा ‘नकाराधिकारा’चा हक्क मान्य करुन निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिलेला प्रभावी पर्याय आहे. राजकीय पक्ष आणि त्यांनी निवडणूकांत उभे केलेले उमेदवार, यांना नाकारण्याचा मतदारांचा अधिकार म्हणजे मतदान यंत्रावरचा सर्वात शेवटी उपलब्ध करुन दिलेला NOTA हा पर्याय..! […]

राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यांचा अभ्यास आवश्यक

मागच्या जाहीरनाम्यातली कोणती आश्वासने व कामे पूर्ण केली, त्याचीही निवडणुकीपूर्वी जंत्री देण्याची राजकीय पक्षांवर सक्ती केली जावी. मागल्या सत्तर वर्षांतले विविध पक्षांचे जाहीरनामे आणि त्यापैकी पूर्तता झालेली आश्वासने व कामे, यांचा तौलनिक अभ्यास केला जावा. प्रचारात उखाळ्यापाखाळ्या काढण्यावर भर नसावा. जमलेल्या गर्दीला आपण नेमके काय करणार हे सांगावे. निवड्णुकीच्या काळात या वर चर्चा व्हावी ही अपेक्षा! […]

देशद्रोहासम गुन्हा दाखल करा

जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा. […]

शबरीमलाच्या निमित्ताने..

शबरीमालाच कशाला, आपल्या प्रत्येक रूढी-प्रथा-परंपरा या का आणि कधी अस्तित्वात आल्या, त्या त्याकाळची समाज व्यवस्था, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती आणि त्यातील किती परंपरा आता सुरु ठेवायला हव्यात आणि कालानुरूप त्यात बदल करावेत की नाही ह्याची कल्पना अभ्यासांती प्रत्येकाला येऊ शकेल. हा अभ्यास केवळ हिन्दूंनीच करावा असं माझं म्हणणं नाही. आपल्या देशातील सर्वच धर्म-पंथाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. […]

मै भी चौकीदार?

भादूर. आमच्या सोसायटीचा वाॅचमन. त्याचं नांव ‘बहादूर’, पण तो ‘भादूर’ असा उच्चार करतो, म्हणून आम्हाही त्याला भादूरच म्हणतो. नेपाळकडचाच आहे. आडनांव माहित नाही. विचारल्यावर एकदा सांगितलं होतं त्याने, पण त्याचा उच्चार माझ्या कानांना इतका विचित्र वाटला, की ते लक्षात राहूनही माझ्या लक्षात राहीलेलं नाही. पण ते थापा नक्की नव्हतं. बुटकासा, गोरा, गरीब आणि प्रामाणिकही..! […]

विलेक्शनचा फार्स

नाटकाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या ‘फार्स’ ह्या नाट्य प्रकारात, सध्याचं मुख्यतः द्विपात्री आणि द्विसंवादी निवडणुक नाट्य फिट्ट बसतं. या नाटकात मुख्य संवाद असे दोनच, ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ किंवा ‘चौकीदार चोर है’ आणि ‘मै भी चौकीदार’ हे, पण वेगवेगळ्या स्वरात आणि कधीकधी तारस्वरात म्हटलेले. […]

चिनी कोलदांडा

चीन आणि पाकिस्तानसारखे विश्वासघातकी देश शेजारी म्हणून लाभले हे भारताचे मोठेच भौगोलिक दुर्दैव आहे. त्यांच्याशी भारताने कितीही चांगले संबंध प्रस्थापित केले.. कशीही जवळीक साधली. तरीही त्यांचं शेपूट काही सरळ होत नाही. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे घात, हेच या दोन्ही राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरण राहिलं आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा कोलदांडा घालून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. […]

सबुरीचा सल्ला कशाला, महाशय ?

आपण जोवर सबुरीनें घेत आहोत, तोवर दहशतवादी ‘मऊ लागलें म्हणून कोपरानें खणणार’च ! . पण जर त्यांना दिसलें की आपण रिटॅलिएट करायला दृढसंकल्प आहोत, तर तें मोठें डिटरंट ठरेल. अशा वेळी, हा पत्रकार सबुरीनें घ्यायला सांगतो, हेंच अनाकलनीय आहे ! […]

अजून किती सहन करायचं ?

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत.  आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही   त्याचीच परिसीमा ठरली. […]

अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचें ‘स्टेटहुड’

…. केजरीवालच्या पाठीराख्यांनो, सत्य कटुच असतें हो ! तरीही या खरें बोलण्यांचा राग आला असला तर माफ करा ; कारण अखेरीस, अरविंद केजरीवालचे अन् माझें alma mater एकच आहे ना ! […]

1 6 7 8 9 10 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..