गाणी बनतानाचे किस्से
प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात.तर काही किस्से बनून जन्माला येतात.एकाच गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. त्यातलीच काही गाण्याचे किस्से […]
गेल्या शंभरहून जास्त वर्षात मराठी माणसाला आवडलेली आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही गाणी.
प्रत्येक गाणे नशीब घेऊन जन्माला येते. काही गाणी गाजतात तर काही विस्मृतीत जातात.तर काही किस्से बनून जन्माला येतात.एकाच गाण्याच्या किस्याबद्दल काही लोकांच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. त्यातलीच काही गाण्याचे किस्से […]
एकाच प्रसंगाच्या आसपास दोन सुंदर रचना ऐकायला मिळाल्या. पूर्वापार ऐकत आलोय तरीही तू-नळीच्या कृपेने एकीचा चक्क भावपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला. प्रसंग समांतर भावनांना वेढून उरलेला आणि दोन्ही गायिका, दोन्ही गीतकार,दोन्ही संगीतकार एकाच तोलामोलाचे आहेत म्हणून की काय उन्नीस-बीस करायला मन धजावत नाही. […]
७०हून अधिक वर्षे सुरांचे आभाळ समर्थपणे पेलणारी लता ! अनेक सहगायकांबरोबर ती गायली आहे. तिची उंची आता सर्वमान्य झालीय. संगीत क्षेत्राचे वादातीत नेतृत्व तिच्याकडे आहे. अशी गायिका पुन्हा होणे नाही. खुद्द भालजी पेंढारकरांनी तिचे वर्णन ” कृष्णाची हरवलेली बासरी ” असे केले आहे. आनंदघन या टोपणनावानें तिने काही चित्रपटांना दिलेलं संगीत अनुभूतीपलीकडचे आहे. तरीही मी वरील शीर्षक वापरतोय. […]
केव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !” उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत. […]
श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता. […]
१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी ) […]
१९७५ साल ! जूनी ११ वीची परीक्षा संपली होती. त्या सुमारास आमच्या घरी सुभाषकाका आले होते. परीक्षा संपल्याच्या आनंदात ते मला आणि माझ्या भावाला उमा टॉकीज मध्ये नुकताच लागलेला “रोटी कपडा और मकान ” चा ९.३० चा शो बघायला घेऊन गेले. तेव्हापासून लता-मुकेशच्या “मैं ना भुलुंगा ” चे गारुड अजूनही अबाधित आहे. […]
हे गाणे तुम्हाला तुमच्या त्या खास जुन्या दिवसात घेऊन जाते. तुमच्या आठवणी जाग्या करते. मनाच्या आतल्या संवेदना हलवून सोडते. जुने दिवस वाईट असले किंवा चांगले असले तरी “हरवलेले” असतात आणि जे हरवलेले असते त्याची चुटपुट आणि ओढ तितकीच तीव्र असते. त्या चुटपुटीची आणि तीव्रतेची जाणीव ह्या एव्हरग्रीन गाण्यात भरलेली आहे. […]
सहकारी चित्रपट संस्था लिमिटेड सांगली द्वारा प्रस्तुत, अण्णासाहेब कराळे द्वारा निर्मित आणि मधुकर पाठक द्वारा दिग्दर्शित एक नितांत सुंदर मराठी चित्रपट,’ संथ वाहते कृष्णामाई ‘. राजा परांजपे, अरुण सरनाईक, चंद्रकांत, कामिनी कदम, गुलाब मोकाशी, जयमाला काळे, विक्रम गोखले, विनय काळे, बर्ची बहाद्दर यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एका स्थापत्य अभियंत्यांच्या जीवनावर आधारित होता. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions