माय तुहे किती आठव आठवू… आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब परीक्षण – डॉ.धोंडोपंत मानवतकर ” माय तुहे किती आठव आठवू ” ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल…इतकी सहज सुंदर झालेली आहे. आईचे […]
‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला […]
आपल्या आजबाजूला पाहिलं की आपणच एकटे एवढे शहाणे कसे, असा प्रश्न नेहमीच आणि हमखास पडतो. उदाहरणार्थ पावसाचंच घ्या ना. पावसाळा म्हटलं की अनेकांचा उर नुसता भरुन येतो. जरा चार थेंब पडले की व्हाट्सॲपवर कांदाभजी आणि वाफाळलेल्या चहाच्या कपांचा पाऊस पडतो. […]
चष्मा म्हणजे चाळिशी किंवा चाळिशी म्हणजे चष्मा अशा भ्रमात किंवा संभ्रमात राहण्याचे दिवस आता डस्टबिनमध्ये जमा झालेले आहेत. एकेकाळी चष्मा डोळ्यांवर चढला किंवा केसांत रुपेणी छटा झळकली की आयुष्याचा मध्यांतर जवळ आला, या कल्पनेने हुरहूर दाटून घेत असले. आता आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून रडणारी मुले सुद्धा चष्म्यात दिसतात. ती चष्मा काढून रडतात आणि रडून झाले की डोळे पुसून पुन्हा चष्मा घालतात. […]
आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. […]
‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे. […]
व्यवस्थापन म्हणा किंवा सर्वसाधारण प्रचलीत शब्द ‘मॅनेजमेंट’ म्हणा, यात अनेक बाबींचा समावेश होतो. सेल्फ डिसील्पीन म्हणजेच स्वयंशिस्त हा व्यवस्थापन-शास्त्राचा मूळ पाया आहे आणि या पायावरच पुढची व्यवस्थापनशास्त्राच्या माध्यमातून ‘यशाची इमारत’ उभी राहणार आहे. […]
चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही. […]
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. […]