‘दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय
हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८ मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”, म्हणजेच साने गुरुजींचा दामू ! ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच होते. […]