कल्याणी ताई आमच्या एका व्याख्यानात म्हणाल्या होत्या- ” देव आपली परीक्षा पाहात असतो. ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत तो मदतीला येत नाही, पण (भक्तांचे) १२ ही वाजू देत नाही.” अस्सी घाटावर शांतपणे दिवे सोडणाऱ्या सनी – साक्षी बरोबर आम्हां पती-पत्नीलाही त्यावेळी कल्याणी ताईंच्या वाक्यामागे साक्षात काशी विश्वेश्वर उभा असलेला जाणवला. […]
पण “दस्तक” मधील लता -सुरीली ! आपल्या आवडत्या मदन भैय्या च्या ओंजळीत ती सगळा गोडवा ओतायची, आणि ही गोड तक्रार खय्याम पासून सर्वांची ! लताच्या सर्वाधिक आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात मदनमोहनची जास्त आहेत. पारितोषिकांनी या चित्रपटाची झोळी भरली. यथावकाश या चित्रपटातील सर्व मंडळी कर्तृत्वाच्या उंचीवर पोहोचली – अपवाद रेहानाचा ! तिची दस्तक कानांवर जास्त काळ रेंगाळली नाही. […]
अनंत वेलणकर आणि ज्योत्स्ना गोखले अशी मराठी नावं, तीही एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो -हिरॉईनची, सोबतीला गुप्ते ,पाटील असे पोलीस अधिकारी (मुंबईतला सिनेमा म्हणून ), माधुरी पुरंदरे आणि सदाशिव अमरापुरकर अशी दिग्गज मंडळी आणि या सर्वांना एकत्र आणणारी मराठमोळ्या विजय तेंडुलकरांची दाहक लेखणी ! आज यातील ओम पुरी, अमरीश पुरी, शफी इनामदार, सदाशिव अमरापूरकर, स्मिता पाटील, दस्तुरखुद्द तेंडुलकर सारे सारे काळाने आपल्या पडद्याआड नेले आहेत पण “अर्धसत्य ” काही विसरता येत नाही. […]
फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच. […]
“खामोशी” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे. […]
चित्रपटक्षेत्र एकच, स्पर्धा एकच तरीही धावणाऱ्यांना पुढे मागे ठेवणारे हे नियतीचे समांतर वेढे ! या जोड्यांमध्ये काही वेगळी जुळवाजुळव होऊ शकली असती कां ? […]
प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते. […]
आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट ! […]
फक्त दोन (दृश्य स्वरूपातील ) स्त्री – पात्रांनी सशक्तपणे पेललेलं, अलीकडच्या काळातील संगीत नाटक म्हणजे – देवबाभळी ! त्या दोघींचे “अहो “होतेच पार्श्वभूमीला, पण दिसत नव्हते. एकतर ऐकूही येत नव्हता. पण त्या दोघांचेही अस्तित्व नाटकाला पुरुन उरले होते. […]
२६ मार्च १९६३ या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते… हरी मेरो जीवन प्राण आधार… अशा “मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी मंदारमाला हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. […]