नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

क्याप – हिंदी कादंबरी

क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे. […]

संगीत राधामानस च्या निमित्ताने…

कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे . […]

खडूचे अभंग

येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो … […]

माओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना

माओवाद्यांचे आव्हान : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना हे  ब्रिगेडियर  हेमंत महाजन यांचे, भारतीय विचार साधना,पुणे यांनी प्रकाशित केलेले,नक्षली  चळवळीचे, इतिहास, आजचे स्वरुप, रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे. […]

कोब्रा … एक अफलातून पुस्तक

मी अकरावीत असल्यापासून डिटेक्टिव्ह पुस्तकं वाचायला लागलो … कॅप्टन दीप …. गोलंदाज … असे अनेक हिरो असत त्या पुस्तकातून …. वेड लागत असे ….. वाचनाचा तो जो नाद त्यावेळी लागला …. साधारण १९७८ पासून तो नंतर वाढतच गेला ….. मग ‘वाचन’ ही पहिली आवड झाली …. घरी शेकडो पुस्तकं घेतली गेली ….. ललित … कादंबऱ्या …. आत्मचरित्र … कथा … युद्धकथा ….कविता … किती किती विषय ….. आणि या पुस्तकांनी मग जगातल्या … मनाच्या …. निसर्गाच्या … कल्पनेपलिकडच्या गोष्टी सांगितल्या ….. […]

गोष्ट एका खर्‍या इडियटची (पुस्तक परिचय )

शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या  विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते… आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्‍या इडीयट ची’ या पुस्तकात!  […]

पाटील-पटवारीची कमाल….. मोगलाई धमाल

गावच्या पाटलाला चुकून आलेलं निजामाचे पत्र, पत्र आल्याने गावभर होणारी चर्चा, पाटलाचे पटवाऱ्याला घेऊन हैद्राबादला जाणं, तिथे त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि मग सुटकेचा थरार. […]

बलिदान देना होगा ! ‘सॅक्रेड गेम्स’

राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे. […]

दिवस आलापल्लीचे … एक वेगळा अनुभव

या पुस्तकाच्या लेखिका ‘आम्ही साहित्यिक’ या आपल्या कुटुंबाच्या सन्माननीय सदस्य आहेत. गेली तीन दशकं त्या संगमनेर इथे ब्युटिशिअन म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे… अभिनय … चित्रकला यात देखील त्या प्रवीण आहेत. विविध विषयावर त्या नियमितपणे लिहीत असतात .. वृत्तपत्रात देखील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. […]

‘ममता’ ….. रहें ना रहें हम, महका करेंगे ….

सिनेमावर कितीही लिहिता येईल ….. हे काही परीक्षण वगैरे अजिबात नाहीये ….. सिनेमा बघितल्यावर मनाला जसं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलंय …. मला सुचित्रा सेनने खूप भुरळ घातली ….तिच्यातल्या वेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने …. माझ्यातल्या लेन्समनला तर खूपच ….. मला तिचे फोटो काढायला खूप आवडलं असतं …. अर्थात ही आता नुसतीच कल्पना ….. तिच्यावर मात्र कधीतरी खास लिहिणार आहे ….. खूप वाचलंय मी हा सिमेना बघितल्यावर …. त्या साठी एखादे वेळेस कोलकात्याला जाईनही … बघू …. […]

1 10 11 12 13 14 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..