स्वस्त्यात पुस्तक ही काय मला सुवर्णसंधी वाटत नाही आणि उगाच माफक किॅमतीत पुस्तक मिळतंय म्हणून पुस्तकं घेणं आणि शोपीस म्हणून घरात ठेवणं हे ही मला पटत नाही. तरीही मी अशा पुस्तक प्रदर्शनात जात असतो. न जाणो एखादं उत्तम जुनं पुस्तक सापडूनही जाईल म्हणून. […]
शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे ‘करपलं रान सारं’ या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड […]
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. […]
लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व. १९ जून १९६४ साली भावे नाटयगृह, सांगली येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, ते आजतागायत नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. अभिनेत्री आशा काळे, गणेश सोळंकी व सुभाष हे पात्र अजरामर केलेले बाळ कोल्हटकर यांनी त्या काळात […]
‘साहित्यात बराचसा मान मचकुरापेक्षा माथ्ल्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली .’ या सुरवातीच्या वाक्याने जी मनाची पकड घेतली ते ‘इत्यलम’ या शेवटच्या शब्दा पर्यंत. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू पासून ते शाहिरांच्या लावण्यापर्यंतचा इतिहासाचे हे अजोड विडंबन! एक छोटेखाननी पुस्तक .फक्त शहात्तर पानांचं !विडंबन हे विनोदाच व्रात्य तरी लाडक आपत्य,याची प्रचीती देणार. […]
आज आपण नाट्यगृहात, महोत्सवात, स्पर्धेत इ. ठिकाणी पाहणाऱ्या नाटकाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परांपरा आहे. पुरातन काळापासून ते आजच्या एकवीसाव्या शतकातील नाटकांच्या सादरीकरणात, शैलीत, तंत्रज्ञानात काळानुरूप बदल होत आले आहेत. जगातील सर्वात पुरातन नाट्यपरंपरा म्हणून ग्रीक आणि भारतातील संस्कृत रंगभूमीची ओळख आहे. […]
कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. […]
“बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या” ही उदगिरी बोलीभाषेतील प्रसाद कुमठेकर यांची आगळी वेगळी कादंबरी. गाव जीवनाचा थांग शोधणाऱ्या या कादंबरीचे ‘वाचन आणि चर्चा’ असा कार्यक्रम २० जानेवारी २०१८ रोजी पु.ल. देशपांडे कला अकादमी येथे पार प्रकाशन द्वारा आयोजित केला गेला. […]
डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. […]
नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले . या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले आहेत . हे अनुभव वाचकांचे केवळ मनोरंजन करत नाहीत तर काही तरी पदरात टाकून जातात . श्रीमंत करून जातात ! सुधा मुर्ती या लेखिका म्हणून सर्वाना परिचित आहेत , पण त्या ‘एक व्यक्ती ‘म्हणून […]