आमीर खानचा ‘दंगल’ चित्रपट काल बघीतला. आमीर खानचा हा चित्रपट कुस्तीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाराच ठरणार आहे. ‘म्हारी छोरियाँ छोरो से कम हैं के?’ असा प्रश्न पुरुष प्रधान व्यवस्थेला विचारत एक बाप आपल्या मुलींना कुस्तीपटू म्हणून कसं घडवतो आणि त्याच्या पोरीही आखाड्यात कशी ‘दंगल’ करतात, याची ही कथा मनोरंजक आहेच, व प्रेरणादायी ही आहे. कुस्तीपटू […]
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद […]
आज ४६ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला. २३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, मा.वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका […]
कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक . हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य – रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत – मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून […]
आज बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री कोंकणा सेनचा वाढदिवस. कोंकणा सेनचा जन्म ३ डिसेंबर १९७९ रोजी झाला. कोंकणा सेन शर्मा ही दिग्दर्शिका अपर्णा सेन शर्मा यांची मुलगी आहे. ‘इंदिरा’ या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत १९८३ साली कोंकणाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती २००० साली ‘एक जे अच्छे कन्या’ या बंगाली चित्रपटात झळकली. चित्रपट जगतात कोंकणाला सर्वात पहिल्यांदा प्रसिध्दी ‘मिस्टर एंड […]
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि […]
आज चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांची जयंती. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट. १. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद) राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील […]
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया। ‘हम दोनो’ चित्रपटातील या गाण्याच्या ओळीप्रमाणेच प्रत्यक्षातही बिनधास्त जीवन जगणाऱ्या सदाबहार देव आनंद यांची पुण्यतिथी देव आनंद यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. देव आनंद यांना बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या कॉलेज मध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख […]
आज डिसेंबरची एक तारीख .. दिन है सुहाना आज पहेली तारीख है..’ हे १९५४ साली आलेल्या, ‘पहेली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेलं एक अफलातून गाणे, अजूनही रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला सकाळी लागते. पहिल्या तारखेला होणाऱ्या पगाराची किमया सांगणारं, सहा मोठी कडवी असलेलं कदाचित त्याकाळी हे सर्वात मोठं गाणं असावं. दर वर्षी एक जानेवारीला […]
आज ३० नोव्हेंबर..ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांची जयंती. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, […]