आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी. बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा ‘अम्मा’ १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया […]
आज डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची पुण्यतिथी माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या […]
ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन झाले.. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित […]
३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या […]
आज ३१ ऑक्टोबर.. आज ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३६ वर्षे झाली. ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने […]
आज २० ऑक्टोबर. आज संगीत संशयकल्लोळ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १०० वर्षे झाली. संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवलयांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला. या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ […]
आज मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांची पुण्यतिथी जन्म:- २० जानेवारी १८९८ आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक […]
आज १९ आक्टोबर…. आज गीतकार मा.शांताराम नांदगावकर यांची जयंती जन्म: १९ आक्टोबर १९३६ “हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर. मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय […]
आज १८ आक्टोबर आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस. जन्म.१८ आक्टोबर १९८० शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी […]
आज १८ ऑक्टोबर आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीचा वाढदिवस. जन्म:- १८ ऑक्टोबर १९७७ त्यांनी आपले शिक्षण जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिडनाहम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले. वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली […]