लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं […]
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ […]
पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा […]
‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील […]
क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र […]
शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची […]
सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात “सेबी (SEBI)” ही भारतातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध मार्ग वापरते. सामान्य गुंतवणूकदारांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्यासाठी “सेबी”ने जुन २०११ मध्ये एका वेबसाईटची निर्मिती केली. scores.gov.in या संकेतस्थळावर आता कोणताही सामान्य गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करु शकतो. गुंतवणूकदारांकडून […]
‘आर्यमा’ हा, श्रीमती चंद्रलेखा बेलसरे यांच्या कवितांचा संग्रह आहे. तो वाचल्यानंतर, त्यावर, एक रसिक वाचक म्हणून, कांहीं लिहावें, असा विचार केल्यामुळे, हा लेख. अर्थात्, त्या अनुषंगानें मनांत आलेल्या कांहीं गोष्टींचाही येथें ऊहापोह केलेला आहे . (सहज, जातां जातां म्हणून सांगतो, चंद्रलेखा बेलसरे या, ‘साहित्य चपराक’ मासिकाच्या उपसंपादक आहेत). प्रस्तुतचा मजकूर म्हणजे स्व-संवादच आहे म्हणा ना ! […]
एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला […]