स्व. सत्यदेव दुबे हे अनेक कलाकारांचे गुरू व नाटककार. पण मुख्यत: ते होते नाट्यदिग्दर्शक. त्यांचा आग्रह असायचा, नाटकात ‘क्रायसिस’ हवा. त्याशिवाय प्रेक्षक त्यात गुंतणार नाहीत. क्रायसिस म्हणजे पेचप्रसंग, ही जर थोडी वरच्या पातळीवरची संकल्पना वाटत असेल तर प्राथमिक स्तरावरचा शब्द वापरू. आपल्याला म्हणता येईल नाटकात संघर्ष हवा. […]
मायावी बाजारांच्या भुलभूलय्यात अडकलेल्या सर्व सामान्य माणसाला-ग्राहक राजाला सावध करणारे, त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणारे आणि या सर्व व्यवस्थेत तो केंद्रस्थानी आहे, हे भान सर्वांना आणणारे हे तळमळीचे लिखाण लिहिले आहे ग्राहक पंचायतीचे प्रसिद्ध कार्यकर्ते श्री सुरेश बहिराट यांनी. दै. लोकमत मध्ये विक्रमी 20 वर्ष लिहिलेल्या ग्राहक चेतना या सदरातील अत्यंत निवडक, महत्वाच्या सार्वकालिक मूल्य असलेल्या लेखांचा हा संग्रह सर्वांसाठीच संग्रहनीयआहे. पृ.200 किं.200 रू. पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : पाने : २०० किंमत – २०० रुपये श्रीपाद कोठे नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015 […]
निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणार्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. शीर्षक : नक्षत्र मैत्री लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर डॉ. मधुकर आपटे पाने : 61, किंमत : 60/- रू प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर […]
“जग जाहिरातीचं अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग” हे नागपूर येथील नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले लेखक सुधाकर घोडेकर यांचे पुस्तक. जाहिरात या विषयावर मराठीतून पुस्तक प्रसिद्ध होणे म्हणजे तसे अप्रुपच. सुधाकर घोडेकर यांच्या या पुस्तकावरून नजर टाकली तरी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत जाहिरातीच्या व्याख्येपासून ते बाजारातील सर्व्हे अत्यावश्यक चाचपणी या विषयापर्यंत जाहिराती संदर्भात मुद्देसुद माहिती दिली आहे. मराठीत जी काय जाहिरात या विषयावर पुस्तके प्रकाशित झाली असतील त्यात सुधाकर घोडेकर यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जग जाहिरातीचे अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग लेखक : श्री. सुधाकर घोडेकर पाने: 160, किंमत : 175 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 […]
आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130 […]
जीवनाचे अस्तित्व असणारी ब्रम्हांडातील आपली एकुलती एक सूर्यमाला. या सूर्यमालेची, त्यातील सर्व ग्रहांची आणि संबंधित अंतराळाची संपूर्ण माहिती आपली सूर्यमाला मध्ये कोणालाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी. हे पुस्तक वाचण्याकरिता तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असण्याची गरज नाही.
`शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ असे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवले आहे. तरी आपल्यापैकी अनेकांना काही ना काही कारणाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. निरनिराळे बॅंकिंग व्यवहार वाढ्ल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढले आहेत. बॅंकेशी किंवा वित्तीय संस्थांशी संबंध येणार नाही असा सुशिक्षित माणूस आता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाचे बॅंकेत किंवा वित्तीय संस्थेत काही ना काही व्यवहार असतातच. अशावेळी दैनंदिन व्यवहारात किंवा पुढे प्रकरण कोर्टात पोहचल्यास निदान प्राथमिक माहिती आपल्याला असणे आवश्यक असते. निवडक बॅंकिंग निवाडे हे पुस्तक आपली ती गरज पूर्ण करते. […]
“प्रदूषणातून पर्यावरणाकडे” या शीर्षकामागे कोणते विज्ञान दडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या हातात हे पुस्तक आल्या आल्या निर्माण झाली. लेखकाचे मनोगत वाचताच या पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे विचार अधिक सक्रीय व तीव्र होतील याची खात्री पटली. स्वानंद सोनी पर्यावरण कार्यकर्ता 9960298639 प्रदुषणातून पर्यावरणाकडे डॉ. किशोर पवार/सौ. नलिनी पवार पाने : 160, किंमत : 160 रू. नचिकेत प्रकाशन […]
संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन. सेवक रचना सेवकांची जबाबदारी व उत्तरदायित्व सेवक भरती, सेवक पदोन्नती, सेवक बदली, सेवक रजा नियम, सेवक शिस्त नियम, सेवकांचे गोपनीय अहवाल, सेवकांना द्यावयाचे आर्थिक लाभ, सेवकांसाठीचे कायदे, सेवक संघटना, सेवकांचा व्यवस्थापनात सहभाग या सर्व विषयांवरील तपशीलवार चर्चा खाली केलेली आहे पाने :156, किंमत : 250 […]
विविध आणि विविध महिमा विविध थोर पुरुषांनी गायींचे महत्व वर्णन करणारे जे जे लिहिले आहे. त्यांचे एकपात्र संकलन गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते या पुस्तकात प्रा. विजय यंगलवार यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. नचिकेत प्रकाशन प्रा. विजय यंगलवार किंमत : 40 रू […]