चाणक्य म्हणजे बुद्धिमत्तेचे, शहाणपणाचे प्रतिनिधिक व्यक्तिमत्त्व. व्यवस्थापनाचा/प्रशासनाचा उद्गाता. अशा या चाणक्याच्या अनुभवसिद्ध शहाणपणाचे सार चाणक्यसूत्रे या आटोपशीर पुस्तकात संकलित केले आहे. मूळ संस्कृत सूत्र आणि लगेच त्याचा मराठी अनुवाद, अशी रचना असणारी एकूण 450 सूत्रे यात आहेत. कोणतेही सूत्र केव्हाही वाचा, त्यावर विचार करा, त्यानुसार आचार करा आणि यशस्वी व्हा. व्यावसायिक जीवन असो की, सांसारिक जीवन सर्वत्र ती सारखीच उपयुक्त व प्रभावी आहेत. यशस्वी जीवनाचा हा सोपा व प्रशस्त मार्ग आहे. चाणक्य सूत्रे/नचिकेत प्रकाशन पाने : ४८ किंमत : 50रू. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. […]
जागतिक खगोलशास्त्राच्या विकासात प्राचीन काळापासून ज्यांनी मोलाची भर टाकली अशा 49 महत्त्वपूर्ण जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांचा परिचय या पुस्तकांत साधार करून दिला आहे. यात 13 भारतीय खगोलशास्त्रज्ञही आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी हे मराठीतील अशा प्रकारचे एकमेव पुस्तक लिहिले आहे. विलास कुळकर्णी जागतिक खगोलशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 125 किंमत : 125 रू. नचिकेत प्रकाशन 9225210130 […]
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. जागतिक रसायनशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 176 किंमत : 180 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन […]
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे ज्ञानाचे-शहाणपणाचे भांडार निवडक अभंगाचे विषयानुसार वर्गीकरण/संकलन केले आहे. डॉ. यादव अढाऊ यांनी. आजच्या घाईगर्दीच्या जीवनात कोणालाही याचा सहज लाभ घेऊन आपले जीवन यशस्वी करता येईल. तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : डॉ. यादव अढाऊ पाने : 80 , किंमत : 75 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन […]
आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी त्यांचे संकलन संपादन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे. देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार पाने : १४०, किंमत : १२५ रू. […]
निसर्गाची नवलाई अनेक अंगाने मनुष्याला खुणावत असते. भूकंप, ज्वालामुखी, आदी या नवलाईची काही रूपे रहस्यमयी, विस्मयकारी आहेत तर धबधबे, सरोवर, गरम पाण्याचे झरे ही रूपे मनोहारी, आल्हाददायी आहेत. अशा विविध 25 नवलाईंमागील रहस्य, विज्ञान, कारणमीमांसा यांचा उलगडा अत्यंत सोप्या ओघवत्या भाषेत प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे यांनी निसर्गाची नवलाई मध्ये केला आहे. कोणत्याही वयोगटाच्या वाचकांना हे लिखाण आवडावे व त्यांच्या ज्ञानात भर पडावी. लेखक : प्रा. सुधीर सहस्त्रबुद्धे डॉ. मधुकर आपटे ,नागपूर प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर वर्धा रोड, नागपूर-15 पाने: ९२,किंमत : रू ९०/- […]
सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. संपादक – नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015 ( : 0712-2285473, भ्र. 9225210130) पाने : ११० किंमत : 350 रु. […]
भूजलप्रदूषण, मातीप्रदूषण, औष्णिक प्रदूषण, आण्विक प्रदूषण या प्रत्येकासाठी स्वतंत्र अशा प्रकरणांत सविस्तर, सखोल, उद्बोधक व उपयुक्त माहिती दिली आहे. सध्या सर्व जगाला भेडसावणाऱ्या जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर आणि आम्लपर्जन्यावर पुस्तकात लिहितांना लेखकांनी या विषयांना योग्य तो न्याय दिला आहे. प्रदूषणातून पर्यावरणाकडे : प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार नचिकेत प्रकाशन : पाने : १६०, किंमत :१६०/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130 […]
भारतीयांची प्रज्ञा आता जगात पुन्हा नव्याने गाजत आहे. भारतीय आणि गणित यांचा अतूट संबंध तर जगात सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. गणिताच्या विकासात अनेक भारतीय गणितींनी/गणितज्ञांनी वेळोवेळी मोलाची भर टाकली. भारतीय गणिती दुसरी आवृत्ती पाने : १८०, किंमत : १८० रू. 24, योगक्षेम ले आऊट, स्नेहनगर, वर्धारोड, नागपूर-400015, (:0712-2285473, 9225210130 […]
मराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. संपर्क : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, पाने : १२०, किंमत : २०० रु. भ्र. 9225210130 […]